घरदिवाळी 202226 ऑक्टोबर रोजी साजरा करा भाऊबीज; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि...

26 ऑक्टोबर रोजी साजरा करा भाऊबीज; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

Subscribe

हिंदू पंचांगानुसार, प्तत्येक वर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला भाऊबीज सण साजरा केला जातो. या वर्षी भाऊबीज बुधवार, 26 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा सण भावा-बहिणीच्या अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. ज्यादिवशी बहिण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावते आणि आरती ओवाळते. तसेच त्याचा दिर्घायुष्याची प्रार्थना करते. दिवाळीनंतर भाऊबीजचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

भाऊबीज शुभ मुहूर्त आणि तिथी
हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक वर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला साजरे केले जाते. यंदा भाऊबीज 26 ऑक्टोबर रोजी असणार आहे. मात्र, भाऊबीज तिथी 2 वाजून 42 मिनिटांपासून सुरु असणार आहे. त्यामुळे भाऊबीज साजरा करण्याची वेळ दुपारी 1:18 ते 3.33 पर्यंत असणार आहे.

- Advertisement -
  • धार्मिक मान्यतेनुसार, भाऊबीजच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  • घरातील देवी-देवतांचा आर्शिवाद घ्यावा. आई-वडिलांचा आर्शिवाद घ्यावा.
  • शुभ मुहूर्तावर बहिणींनी आपल्या भावाचे औक्षण करावे. त्यावेळी पूजेच्या ताटामध्ये कुंकू, अक्षता, चंदन आणि धूप-दीप, मिठाई ठेवावी.
  • भावाला टिळक लावताना “भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भक्तमिमं शुभं, प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषतः” हा मंत्र वाचावा आणि भावाच्या दिर्घायुष्यासाठी कामना करावी.

 


हेही वाचा :

भाऊबीज का साजरी केली जाते? काय आहे यमराज आणि यमुनेची कथा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -