घरअर्थजगतकाही वेळातच शेअर बाजारात होणार मुहूर्ताचे सौदे, 15पैकी 11 वेळा होती तेजी

काही वेळातच शेअर बाजारात होणार मुहूर्ताचे सौदे, 15पैकी 11 वेळा होती तेजी

Subscribe

मुंबई : देशभरात दिवाळीची धूम आहे. अभ्यंग स्नान आणि लक्ष्मीपूजनाला सर्व सरकारी कार्यालयांबरोबरच मुंबई (BSE) आणि राष्ट्रीय (NSE) शेअर बाजारही बंद असतात. पण प्रत्येकवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजानाला मुहूर्ताचे सौदे (Muhurt Trading) होतात. हे सौदे शुभ मानले जातात.

यावर्षी बीएसई आणि एनएसईमध्ये एक तासाचे ट्रेडिंग होणार आहे. या दोन्ही शेअर बाजारांमध्ये संध्याकाळी 6.15 ते 7.15 या काळात मुहूर्ताचे सौदे होतील. तर, सायंकाळी 6 ते 6.08 या काळात प्री ओपन सेशन होईल. या तासाभराच्या व्यवहारात गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर शेअर खरेदी करतील, अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

दिवाळीमध्ये शेअर बाजारात मुहूर्ताचे सौदे करण्याची 50 वर्षांची परंपरा आहे. दिवाळीचे पर्व हिंदू नववर्षाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. धन, समृद्धी आणि भाग्याच्या स्वागताच्या दृष्टीने संपूर्ण भारतात हा काळ शुभ मानला जातो. विशेषत:, गुंतवणूकदार या सौद्यांना खूपच शुभ मानतो. एका अहवालानुसार गेल्या 15पैकी 11 मुहूर्तांच्या सौद्यांमध्ये तेजी नोंदवली गेली. कारण गुंतवणूकदारांचा विक्रीपेक्षा खरेदीवर भर असतो. या वेळी देखील बाजारात तेजी राहील आणि मुंबई शेअर बाजारा निर्देशांक 60 हजारांच्या पार जाईल, असा अंदाज आहे.

गेल्यावर्षी निर्देशांक गेला होता 60 हजार पार
गेल्या वर्षी 4 नोव्हेंबर रोजी दिवाळीला मुहूर्ताचे सौदे झाले. त्या एका तासात मुंबई शेअर निर्देशांक 60 हजारांच्या वर पोहोचला होता. मुहूर्ताच्या सौद्यात निर्देशांक 60 हजार 67 तर, राष्ट्रीय शेअर निर्देशांक 17 हजार 921 अंकांवर बंद झाला होता. निर्देशांकाचा विचार केला तर, गेल्या शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा तो 104.25 अंकांनी वधारून 59,307.15 अंकांवर गेला होता.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -