घरमहाराष्ट्रफडणवीस फार कमी रागावतात, पण कधी-कधी पारा चढतो कारण...

फडणवीस फार कमी रागावतात, पण कधी-कधी पारा चढतो कारण…

Subscribe

दिवाळी अंकात कुंभ राशीबद्दल चांगलं लिहिलं असेल तोच अंक मी वाचतो.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीचं औचित्य साधून पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. दरम्यन या अनौपचारिक गप्पा सुरु असताना फडणवीस यांनी भाष्य केले त्याचीच चर्चा सध्या सुरु आहे. ”मी सागर बंगल्यावरच खुश आहे. इथे खूप सकारात्मकता आहे”. असं म्हणत देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadanvis) यांनी टीका करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले. दरम्यान राज्यात सत्तांतर झाले पण देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. हा देवेंद्र फडणवीस यांचा अपमान आहे असं म्हणत विरोधक फडणवीस यांच्यावर टीकाही करत होते.

दरम्यान देवेंद्र फडणवीस बोलत असताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबद फडणवीस म्हणाले, ”राज्यमंत्री लवकर केले नाही तर त्याचा राज्याच्या कारभारावर परिणाम होतो त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे”. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shidne) केव्हा झोपतात हा खरंच संशोधनाचा विषय आहे. कारण पहाट असो किंवा रात्र मुख्यमंत्री विविध कार्यक्रमांना उपस्थित असतात यावरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. तुम्हाला राग का येतो असा प्रश्न सुद्धा पत्रकारांनी फडणवीस यांना विचारला तेव्हा फडणवीसांनी अगदी मिश्कीलपणे याचे उत्तर दिले.

- Advertisement -

यावर फडणवीस म्हणाले, ”मला जेव्हा भूक लागते तेव्हाच मला राग येतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सध्या राजकारणात कटुता वाढली आहे. दिवाळी अंकात कुंभ राशीबद्दल चांगलं लिहिलं असेल तोच अंक मी वाचतो. आमचा पायाभूत सुविधांवर भर आहे. आम्ही मुंबादेवी कॉरिडोर उभारणार आहोत असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. असंही फडणवीस म्हणाले. माझ्याकडे खूप सहनशक्ती आहे आणि हे तुम्ही २५ वर्षात पाहिलं असेल असंही फडणवीस म्हणाले.


हे ही वाचा –  पुराव्याशिवाय पतीला स्त्रीलंपट आणि मद्यपी म्हणणे ही क्रूरता – मुंबई उच्च न्यायालय

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -