घरठाणेमुंबईत समाजकंटक इमारतींवर करतोय फटक्यांचा मारा,नागरिक धास्तावले; पोलिसांकडून शोध सुरू

मुंबईत समाजकंटक इमारतींवर करतोय फटक्यांचा मारा,नागरिक धास्तावले; पोलिसांकडून शोध सुरू

Subscribe

महाराष्ट्रासह मुंबईत दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. अनेक जण फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद घेत आहेत. मात्र ही अवली तरुण फटाके फोटताना काही थ्रिलिंग करण्याच्या नादात नको ते उपद्रव करताना दिसतात. असाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक समाजकंटक आकाशात जाऊन मोठ्याने फुटणाऱ्या फटक्यांचा बॉक्स हातात घेत तो इमारतींच्या घरांवर सोडत आहे. हे पेटते फटाके इमारतींमधील कोणाच्याही घरावर, खिडकीवर जाऊन आपटत आहेत.

- Advertisement -

हातात फटाक्याचा बॉक्स घेऊन फटाके फोडणाऱ्या या तरुणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो आकाशात जाऊन फुटणाऱ्या फटाक्यांचा पेटवलेला बॉक्स हातात घेऊन इमारतींच्या दिशेने धरला आहे. यात एकामागोमाग एक फटाके इमारतींवर जाऊन आदळत आहे. या व्हिडीओतील तरुणाविरोधात पोलिसाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ उल्हासनगर परिसरातील असल्याचे म्हटले जातेय. त्यामुळे पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाळीनिमित्ताने सगळेजण आनंद घेत असतील पण सर्वांनी फटाके फोडताना काळजी घेतली पाहिजे. कारण अनेकजणांना दुखापत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. सध्या या तरूणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

ठाणे शहरातील उल्हासनगर परिसरातील हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर ठाणे पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेतली आहे. @nawab69_ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. दरम्यान दिवाळीनिमित्त सोमवारी ठाण्यात फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. एकट्या ठाण्यात आगीच्या 11 घटना घडल्या. जिल्हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठाणे अग्निशमन दलाला दिवाळीच्या दिवशी एकूण 16 फोन आले, त्यापैकी 11 फटाक्यांमुळे आग लागल्याचे होते. मुंबई आणि लगतच्या परिसरातही आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत.


जॉन्सननंतर युनिलिव्हर कंपनी वादात; TRESemme शाम्पूमुळे होतोय कॅन्सर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -