घरदेश-विदेशदहशतवाद कमी करायचा असेल तर त्यांचा वित्तपुरवठा थांबविणे गरजेचे - परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

दहशतवाद कमी करायचा असेल तर त्यांचा वित्तपुरवठा थांबविणे गरजेचे – परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

Subscribe

दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे.

शुक्रवारी मुंबईतील ताजमहाल या हॉटेलमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतर्फे दहशतवादविरोधी समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी समितीच्या सदस्यांनी 26/11 च्या भीषण हल्ल्याचे स्मरण करून येथे शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. बैठकीदरम्यान ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेम्स क्लेवर्ली यांनी सांगितले की, ब्रिटन कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा निषेधच करतो. दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी आम्ही भारत आणि आमच्या मित्रराष्ट्रांसोबत काम करण्यासाठी तयार आहोत, असे ते म्हणाले. (If we want to reduce terrorism, we need to stop financing it – External Affairs Minister S Jaishankar)

- Advertisement -

या कार्यक्रमाला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर म्हणाले, 26/11 चा हल्ला ज्या ठिकाणी झाला होता, त्या ठिकाणी UNSC दहशतवाद विरोधी समितीने एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकत्रितपणे आपण आंतरराष्ट्रीय समुदायाला संदेश द्यायला हवा की संयुक्त राष्ट्र आणि त्याचे सदस्य राष्ट्र दहशतवाद्यांना जबाबदार धरण्यात कधीही हार मानणार नाहीत. “आम्ही 26/11 च्या हल्ल्याच्या मास्टरमाइंड आणि गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु हे काम अद्यापही अपूर्ण आहे,” ते म्हणाले. यादरम्यान परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी 26/11 च्या स्मृतीस्थळाला पुष्पहार अर्पण करताना सांगितले की, मुंबईवर झालेला हा हल्ला कधीही विसरता येणार नाही.

सुरक्षा परिषदेची कारवाई खेदजनक आहे

- Advertisement -

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे. आज आम्ही पीडितांचा आवाज ऐकला आहे. हा आघात आपण नेहमी लक्षात ठेवू आणि दहशतवाद्यांना न्यायव्यवस्थेसमोर आणण्याचा प्रयत्न करू. ते म्हणाले, दहशतवादाचा मुकाबला करण्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा आणि हाच वित्तपुरवठा तातडीने थांबविणे गरजेचे आहे. काही दहशतवाद्यांवर बंदी घालण्याच्या बाबतीत सुरक्षा परिषद राजकीय कारणास्तव कारवाई करू शकली नाही हे खेदजनक आहे. यामुते आमची सामूहिक विश्वासार्हता आणि आमचे सामूहिक हितसंबंध कमी होते.


हे ही वाचा – जागा 1 उमेदवार 35; गुजरातमध्ये काँग्रेसच्या जागेवर भाजपचा दावा, एवढे महत्त्व कशासाठी? 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -