घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरठाकरे-शिंदे संघर्ष पुन्हा वाढणार? सिल्लोडमध्ये सत्तार अन् आदित्य ठाकरे शक्तिप्रदर्शन करणार

ठाकरे-शिंदे संघर्ष पुन्हा वाढणार? सिल्लोडमध्ये सत्तार अन् आदित्य ठाकरे शक्तिप्रदर्शन करणार

Subscribe

खोके सरकारवर आदित्य ठाकरे नेहमीच टीका करत असतात परंतु सत्तारांच्या मतदारसंघात येऊन आदित्य ठाकरे टीका करणार आहेत. तर याच वेळी अब्दूल सत्तार यांनीसुद्धा सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. या सभेत कोणाची तोफ धडाडणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

शिवसेनेमध्ये दोन गट पडले असून गेल्या चार महिन्यांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये संघर्ष सुरु आहे. दोन्ही गटाकडून वेळोवेळी शक्तिप्रदर्शन करण्यात येते. सत्तांतर झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक बंडखोर मतदारांच्या जिल्ह्यात सभा घेतल्या आहेत. आता ठाकरे गटाकडून आमदार आदित्य ठाकरेसुद्धा सभा घेऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. आदित्य ठाकरेंचं आव्हान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वीकारले आहे. तर आता कोणाच्या सभेत जास्त गर्दी होते यावरुन राजकारण सुरु झाले आहे. आदित्य ठाकरे – कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामध्ये सभेदरम्यान टोकाची टीका होण्याची शक्यता आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोडमध्ये सभा घेणार आहेत. या सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा होणार असल्याचा दावा करण्यात येणार आहे. खोके सरकारवर आदित्य ठाकरे नेहमीच टीका करत असतात परंतु सत्तारांच्या मतदारसंघात येऊन आदित्य ठाकरे टीका करणार आहेत. तर याच वेळी अब्दूल सत्तार यांनीसुद्धा सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. या सभेत कोणाची तोफ धडाडणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन

ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सभेदरम्यान शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार गर्दी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभेत उपस्थित राहण्याची विनंती करणार का? असा प्रश्न चर्चेत आहे. ‘सिल्लोडमध्ये छोटे पप्पू येणार असून कोणाच्या सभेला जास्त गर्दी होते पाहू’ असं वक्तव्य करत सत्तार यांनी एकप्रकारे आदित्य ठाकरेंना आव्हानच दिलं आहे.

खोक्यांवरुन वाद चिघळणार

शिवसेनेतून वेगळे झालेल्या ४० आमदारांनी प्रत्येकी ५० खोके घेतले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आदित्य ठाकरेसुद्धा प्रत्येक सभेत खोक्यांवरुन सत्ताधाऱ्यांना डिवचत असतात. आता आदित्य ठाकरे सत्तारांच्या बालेकिल्ल्यात येऊन काय बोलणार? सत्तारांवर कोणत्या भाषेत टीका करणार? अशी चर्चा सुरु आहे. तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती दिसत नसल्याच्या सत्तारांच्या वक्तव्यावरुन आदित्य ठाकरे आक्रमक पवित्रा घेत आहेत. यावरुन दोन्ही नेत्यांचे वक्तव्य राजीनाम्यापर्यंत पोहोचले आहे. सत्तार यांनी राजीनामा देण्याचे प्रतिआव्हानसुद्धा आदित्य ठाकरेंना दिलं आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरे छोटा पप्पू – सत्तार 

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे दुसरे छोटे पप्पू आहेत अस वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. राज्यातील उद्योग गुजरातला गेल्याच्या आरोपांवरुन सुरु झालेली वाकयुद्ध राजीनामापर्यंत आले आहे. यातच आदित्य ठाकरेंचा पप्पू म्हणून उल्लेख केल्यामुळे ठाकरे गट- शिंदे गटात संघर्ष अधिक बळावण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : बच्चू कडूंचं तर कळलं, पण फडणवीसांनी आणखी ६ आमदारांना केले होते फोन?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -