घरदेश-विदेशमध्य प्रदेशातून महाराष्ट्रात परतणाऱ्या मजुरांच्या कारचा अपघात; 11 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात परतणाऱ्या मजुरांच्या कारचा अपघात; 11 जणांचा मृत्यू

Subscribe

महाराष्ट्रात काम करणारे हे मजूर दिवाळी आणि छठ पूजेसाठी आपल्या घरी गेले होते आणि त्यानंतर तवेरा गाडीने घरी परतत होते.

मध्य प्रदेशात गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. मध्य प्रदेश मधील बैतूल जिल्ह्यातील झाल्लार पोलीस ठाण्याजवळ हा अपघात झाला. दुपारी रात्री 2.15 च्या सुमारास एका रिकाम्या बसला तवेरा कारची धडक झल्याने अपघात झाला या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला, तर कार चालक गंभीर जखमी झाला आहे. करा चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघात मृतांमध्ये पाच पुरुष, चार महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. सर्व मृतांचे मृतदेह झाल्लार प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. सर्व मृत व्यक्ती याच गावाच्या राहणाऱ्या होत्या. (Car accident involving laborers returning to Maharashtra from Madhya Pradesh; 11 deaths)

घटनास्थळापासून या गावाचे अंतर फक्त एक किलोमीटर आहे. अपघाताबाबत माहिती देताना बैतूलचे एसपी सिमला प्रसाद म्हणाले की, बैतूलच्या झाल्लार येथून 20 दिवसांपूर्वी सर्व लोक अमरावतीच्या एका गावात कामासाठी गेले होते, गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सर्व लोक अमरावतीहून झाल्लारकडे निघाले होते. रात्री दोन वाजता ड्रायव्हरला झोप आवरली नाही आणि ताच्या गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट बसला धडकली, हा अपघात खूपच भीषण होता, दोन मुलांसह इतर 11 जण जागीच ठार झाले. दरम्यान हे सर्वजण महाराष्ट्रातील कळंबा येथून आपल्या गावाकडे जात होते. महाराष्ट्रात काम करणारे हे मजूर दिवाळी आणि छठ पूजेसाठी आपल्या घरी गेले होते आणि त्यानंतर तवेरा गाडीने घरी परतत होते.

- Advertisement -

या अपघातात कारची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली. गाडीचे फोटो पाहून या अपघाताच्या तीव्रतेची कल्पना येते. अपघातानंतर कार कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. अपघाताची माहिती मिळताच एसपीसह अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. एसपी आणि डीएम यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना सरकारच्या नियमांनुसार मदत देण्याबाबत सांगितले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच मुरैना जिल्ह्यात मंगळवारी असाच एक भीषण अपघात झाला होता. डंपर आणि बोलेरो कार यांच्यात धडकी झाली होती. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

हे ही वाचा – बॉम्बे हायकोर्टाचे महाराष्ट्र हायकोर्ट करा, माजी न्यायाधीशांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -