घरमुंबईपुरावे समोर आले, आता कारवाई व्हायला हवी; पेडणेकरांविरोधातील गुन्ह्याबाबत सोमय्यांचे विधान

पुरावे समोर आले, आता कारवाई व्हायला हवी; पेडणेकरांविरोधातील गुन्ह्याबाबत सोमय्यांचे विधान

Subscribe

किशोरी पडणेकर यांनी संजय अंधारी यांच्याशी करार केला तर त्यांना समोर का नाही आणलं? असा प्रश्न सुद्धा सोमय्या यांनी उपस्थित केला.

राजकारणात नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात. अशातच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी साधी संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. त्या नंतर सोमय्या यांनी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले. किशोरी पेडणेकर यांनी एसआरए प्रकरणी घोटाळा केला असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पेडणेकरांवर केला. याच प्रकरणी सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांचावर मुंबईतील काही ठिकाणच्या पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल केला त्याच संदर्भांत निर्मल नगर पोलीस ठाण्यात भेट दिल्या नंतर सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी सोमय्या म्हणाले, पोलिसांसोबत माझी 25 ते 30 मिनिटे चर्चा झाली. माझ्याकडे असलेले सर्व पुरावे मी पोलिसांना दिले आहेत त्यानंतर पोलिसांनी मला आश्वासन सुद्धा दिले की पुराव्यांनुसार संबंधित विभागांशी चर्चा करून, योग्य ती माहिती घेऊन मग कारवाई केली जाईल असे पोलिसांनी म्हटल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

- Advertisement -

या प्रकरणी पोलिसांनी माहिती मिळविण्यासाठी जर का मंत्रालयाशी संपर्क साधला तर जी वास्तविकता आहे ती पोलिसांपुढे ठेवण्यात येईल असे आश्वासन मंत्रालयाकडून देण्यात आल्याचे सोमय्या यांनी संगितले.

किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर यांच्याविरोधात मारिन लाईन आणि दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. त्याचबरोबर, चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हा दोघही एसआरएचे गाळे बळकविण्यात पार्टनर होते असंही किरीट सोमय्या म्हणाले. दरम्यान दादर पोलीस ठाण्याकडून याप्रकरणी तपास करण्यात आला त्या तपासात चंद्रकांत चव्हण यांच्या विरोधात आणखी काही तक्रारी समोर आल्या. त्यामूळेच आता पुरेसे पुरावे समोर आले आहेत आता कारवाई व्हायला हवी असं विधान सोमय्या यांनी केले.

- Advertisement -

किशोरी पडणेकर यांनी संजय अंधारी यांच्याशी करार केला तर त्यांना समोर का नाही आणलं? असा प्रश्न सुद्धा सोमय्या यांनी उपस्थित केला. पण तेव्हा हे प्रकरण उद्धव ठाकरे यांनी दाबलं असा दावासुद्धा सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना केला.


हे ही वाचा – मुख्यमंत्री दालनात दुपारी दोनपर्यंत ‘नो एन्ट्री’, गर्दी नियंत्रणासाठी नवा फतवा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -