घरक्रीडाIPS अधिकाऱ्याविरोधात महेंद्रसिंग धोनीची उच्च न्यायालयात याचिका, नेमकं प्रकरण काय?

IPS अधिकाऱ्याविरोधात महेंद्रसिंग धोनीची उच्च न्यायालयात याचिका, नेमकं प्रकरण काय?

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच, न्यायालयाने या प्रकरणीची सुनावणी मान्य केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच, न्यायालयाने या प्रकरणीची सुनावणी मान्य केली आहे. हे प्रकरण 2013 च्या आयपीएलमधील मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित आहे. (Former Indian Captin MS Dhoni files contempt of court plea against IPS officer in Madras HC)

महेंद्रसिंग धोनी याने आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्यावर वकिलाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी मंगळवारपासून सुनावणी सुरू होणार आहे.

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2013मध्ये मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित प्रकरणे समोर आली होती. या मॅच फिक्सिंगप्रकरणाच्या चौकशीचे नेतृत्व आयपीएस अधिकारी संपत कुमार करत होते. त्यावेळी आयपीएस अधिकारी संपत कुमार यांनी मॅच फिक्सिंगप्रकरणी महेंद्रसिंग धोनीचेही नाव घेत त्याच्यावर टीप्पणी केली होती. याच टीप्पणीनंतर महेंद्रसिंग धोनीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय “आयपीएस अधिकारी संपत कुमार यांनी स्पॉट फिक्सिंगवरून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. माझ्याविरोधात खोट्या बातम्या आणि खोटी वक्तव्ये करत आहे”, असे धोनीने म्हटले होते.

या टीप्पणीनंतर महेंद्रसिंग धोनीने न्यायालयाकडे 100 कोटी रुपयांची नुकसान भरपाईही मागितली होती. त्यानंतर 2014 मध्ये न्यायालयाने संपत कुमार यांना महेंद्रसिंग धोनीविरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्यास मनाई केली होती. मात्र, यानंतरही संपत कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. ज्यामध्ये न्यायालयीन व्यवस्थेबद्दल आणि त्यांच्याविरुद्धच्या खटल्यांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणारे प्रमुख वकील यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली होती. या प्रकरणाची मंगळवारपासून संपूर्ण सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बासला 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -