घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यात १० दिवसांत ११ सहकारी संस्थांचे मतदान; 'इतक्या' झाल्या बिनविरोध

जिल्ह्यात १० दिवसांत ११ सहकारी संस्थांचे मतदान; ‘इतक्या’ झाल्या बिनविरोध

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुकांनी राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना येत्या १० दिवसांत तब्बल ११ महत्वाच्या सहकारी संंस्थांसाठी मतदान होणार आहे. केवळ १० संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने निवडणुकीच्या निमित्ताने सहकार विभागाचे कामही वाढले आहे.

सहकारी संस्था, बँकांना सहकार विभागाचा कणा समजला जातो. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल आता वाजल्यामुळे जिल्ह्यातील ४२ संस्थांची निवडणूक येत्या काळात होत आहे. त्यातील २० संस्थांसाठी येत्या ६ आणि १३ तारखेला विविध ठिकाणी मतदान होणार आहे. नाशिक जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था, मायको एम्लॉईज को-ऑप क्रेडीट सोसायटी सातपूर, एच. ए. एल.एप्लॉईज को-ऑप क्रेडीट सोसायटीसाठी शनिवारी (दि.१२) मतदान होणार आहे. याव्यतिरीक्त इतर सर्व संस्थांचे मतदान हे रविवारी होत असल्याने वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी येत्या रविवारी (दि.6) मतदान होत असल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. एकूण १५ जागांसाठी तब्बल ४२ उमेदवार रिंगणात असले तरी ‘आपला पॅनल’ व ‘सहकार पॅनल’ यांच्यात सरळ लढत रंगणार असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील पंचायत समित्यांसह आरोग्य केंद्रातील मतदार यात सहभागी होणार असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची चांगलीच दमच्छाक झाली. तसेच जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून लौकिक असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी पतसंस्थेसाठी रविवारीच मतदान होत असल्याने या निवडणुकीतही चुरस निर्माण झाली आहे. त्यासोबतच समर्थ सहकारी बँक, जनलक्ष्मी बँक, येवला मर्चंट को-ऑप बँकांची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

यांचा वाजला बिगूल

  • जिल्हा रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्था, नाशिक
  • नाशिक डिस्ट्रीक्ट प्रायमरी टीचर्स को-ऑप केडीट सोसायटी
  • येवला मविप्र सेवक सहकारी पतसंस्था
  • ओझर मर्चटस को-ऑप बँक, ओझर
  • जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था
  • ग्रामसेवक सहकारी पतसंस्था
  • समर्थ सहकारी बँक
  • जिल्हा आदिवासी विकास विभाग सरकारी कर्मचारी सहकारी पतपेढी, नाशिक
  • मायको एम्लॉईज क्रेडीट सोसायटी, सातपूर
  • जनलक्ष्मी बँक एच.ए. एल क्रेडीट सोसायटी, ओझर टाऊनशिप
  • येवला मर्चन्ट को-ऑप बँक, येवला

बिनविरोध झालेल्या संस्था

  • एलआयसीएआय नाशिक डिव्हीजन एम्लॉईज क्रेडीट सोसायटी
  • मालेगाव मर्चंट को-ऑप बँक, मालेगाव
  • पिंपळगाव मर्चंट्स बँक, पिंपळगाव
  • लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक, लासलगाव
  • सिन्नर तालुका सेंकडरी टिचर्स केडीट सोसायटी
  • महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन, नाशिक
  • इंदिरा महिला सहकारी बँक, मालेगाव
  • सरस्वती सहकारी बँक, ओझर
  • आर. डी. आप्पा क्षीरसागर सहकारी बँक, निफाड
  • निफाड अर्बन को-ऑप बँक, निफाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -