घरमहाराष्ट्रसायरस मिस्त्रीप्रकरणी महिला चालकाविरोधात गुन्हा

सायरस मिस्त्रीप्रकरणी महिला चालकाविरोधात गुन्हा

Subscribe

वसई : उद्योगपती सायरस मिस्त्री कार अपघातप्रकरणी अखेर शनिवारी दुपारी कासा पोलीस ठाण्यात कार चालक महिला अनाहिता डरायस पंडोल ( वय ५५, रा. रज्जाब महेल, चर्चगेट, मुंबई) यांच्याविरोधात भादविस कलम ३०४ (अ), २७९,३३७,३३८ सह मोटार वाहन कायदा कलम ११२/१८३, १८४, मोटार वाहन चालक नियम १४,०५,०६/१७७ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

४ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोल गावच्या हद्दीतील सूर्या नदी पूलाच्या कठड्याजवळ मर्सिडीज बेँझ कारचा अपघात झाल होता. या भिषण अपघातात उद्योगपती सायर पालनजी मिस्त्री आणि डिनशा पंडोल यांचा मृत्यू झाला होता. तर अनाहिता डरायस पंडोल आणि डरायस पंडोल किरकोळ जखमी झाले होते.

- Advertisement -

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती मृत्यू झाल्यानंतर देश हादरून गेला होता. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी सुरु करण्यात आली होती. वसई प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि मर्सडिज बेंझ इंडिया कंपनीकडून कारची तांत्रिक तपासणी करून अहवाल पोलिसांना देण्यात आला होता. तसेच चौकशीत कारचालक अनाहिता डरायस पंडोल यांनी कार हयगयीने आणि अविचाराने भरधाव वेगात चालवून धोकादायकरित्या ओव्हरटेक करताना सूर्या नदी पूलाच्या कठड्याला ठोकर मारल्याने अपघात झाल्याचे उजेडात आले आहे.

त्यामुळे याअपघाताला अनाहिता पंडोल यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याविरोधात कासा पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी करत आहेत.


हेही वाचा : ईडीच्या कारवाईत भाजप नेते का नाहीत ;ते काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? भुजबळांचा संतप्त सवाल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -