घरताज्या घडामोडीगुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवा रे; अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून मनसेच्या गजानन काळेंचे ट्वीट

गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवा रे; अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून मनसेच्या गजानन काळेंचे ट्वीट

Subscribe

राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील मंथन शिबीरात उपस्थित राहिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याचदरम्यान शरद पवारांनी काही काळ रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात हजेरी लावली.

राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील मंथन शिबीरात उपस्थित राहिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याचदरम्यान शरद पवारांनी काही काळ रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात हजेरी लावली. मात्र, त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अनुपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते गजानन काळे यांनी “गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवा रे. कूछ तो गडबड हैं”, असे ट्विट केले आहे. गजानन काळे यां या ट्विटमुळे पुन्हा एकदा अजित पवार नाराज आहेत की मागच्या वेळी सारखे काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (NCP Ajit Pawar MNS Gajanan Kale Tweet Guwahati)

गजानन काळेंचे ट्विट

- Advertisement -

“आदरणीय पवार साहेब तब्येत ठीक नसतांना राष्ट्रवादीच्या शिबिरात येतात व अजितदादा बरोबर त्याच वेळी वैयक्तिक कारण सांगून अनुपस्थित राहतात. ही बाब काही पचनी पडत नाही. तसेही दादा विरोधी पक्षनेते म्हणून शांत आहेत काही दिवसांपासून…. गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून रहा रे. कूछ तो गडबड हैं”, असे ट्विट गजानन काळे यांनी केले.

याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यक्रमात अजित पवार नाराज होऊन निघून गेले होते. मात्र त्यावेळी आपण नाराज नसून लघुशंकेला गेलो होतो, असे ते म्हणाले होते.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर राहतील, असं बोलले जात होते. मात्र हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताही शरद पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबीरात उपस्थिती दर्शवली. शरद पवारांची ही उपस्थिती अवघ्या राज्यासाठी लधवेधी ठरली. हाताला पट्ट्या असताना आणि उपचार सुरू असताना एका दिवसासाठी ते कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी ते शिबिराला गेले. त्यांच्या या प्रबळ इच्छेची चर्चाही झाली. तसेच, या मंथन शिबिरात पाच मिनिटे भाषणही केले.

याशिवायस शिर्डीतील मंथन शिबीरात राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन 100 चा नारा दिला आहे. शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आदी दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.


हेही वाचा – नटी’ म्हणून उल्लेख, सुषमा अंधारेंवर टीका करताना गुलाबराव पाटलांनी पातळी सोडली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -