घरपालघरपालघरमध्ये दोन एसटी बसचा अपघात; 22 प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

पालघरमध्ये दोन एसटी बसचा अपघात; 22 प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

Subscribe

जव्हार (अतिक कोतवाल) : जव्हार – सेलवास मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक व जळगाव आगाराच्या दोन बसचा सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात नाशिकच्या चालक व वाहकासह 20 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना जव्हार येथील पतंगशाह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

जव्हारहून सेलवासकडे जाणारी नाशिक आगाराची एसटी बस आणि सेलवासकडून जव्हारच्या दिशेने येणारी जळगाव आगाराची बस वळणावर एकमेकांना धडकल्या. जव्हारपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर घाट रस्ता असलेल्या प्रकाश पोल्ट्री, भरसटमेट गावाजवळ हा अपघात झाला. त्यात 22 जण जखमी झाले असून त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘तो’ निर्णय घेऊन मस्क चुकले, कर्मचाऱ्यांना पुन्हा केला फोन; वाचा नेमके काय घडलं?

आधीच आगीच्या दोन घटना
एसटी महामंडळाच्या दोन शिवशाही बसना आग लागल्याच्या घटना गेल्या आठवड्यात घडल्या आहेत. पुण्यातील अत्यंत रहदारीच्या असलेल्या शास्त्रीनगर परिसरात 1 नोव्हेंबर रोजी शिवशाही बसला आग लागली. यवतमाळ-औरंगाबाद-पुणे असा प्रवास करत ही बस येरवाडमधील शास्त्रीनगर येथील गलांडे हॉस्पिटलजवळ आली. तेव्हा चालकाला काहीतरी बिघाड झाल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी गाडी बाजूला घेत प्रवाशांना खाली उतरवले. प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर गाडीने पेट घेतला. चालकाच्या प्रसंगवधनामुळे तब्बल 42 प्रवाशांचा जीव वाचला आहे.

- Advertisement -

तर. ही घटना घडल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबरला नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील माळवाडी शिवारात भररस्त्यातच शिवशाही बसने पेट घेतला होता. मागून येणार्‍या कारचालकाने बसचालकाला वेळीच आग लागल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर बसचालकाने तातडीने बस रस्त्याच्या थांबवत सर्व प्रवाशांना खाली उतवले. बसने पेट घेतला. त्यावेळी बसमध्ये एकूण 43 प्रवासी होते.

हेही वाचा – ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव, ‘सामना’तून भाजपा आणि शिंदे गटावर शरसंधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -