घरठाणेमारहाण करून 'हर हर महादेव'चा शो बंद पाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक

मारहाण करून ‘हर हर महादेव’चा शो बंद पाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक

Subscribe

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील वीवीयाना मॉलमधील 'हर हर महादेव' या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांना आज जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांना आज जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली. (Jitendra Awhad arrested for beating and stopping the show of Har Har Mahadev)

जितेंद्र आव्हाडांचे ट्विट

- Advertisement -

“आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो”, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले.

“मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल”, असेही ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

- Advertisement -

“हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही”, असेही त्यांनी म्हटले.

माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ या मराठी चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ठाणे जिल्ह्यातील वीवीयाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नेमके प्रकरण काय?

‘हर हर महादेव’ या चित्रपटाला विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री 11 वाजता ठाण्यात आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना सिनेमागृहातून बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावले. त्यानंतर काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाणही केली. या घटनेनंतर ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या 141, 143, 146, 149, 323, 504, अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत आव्हाड यांच्यासह त्यांच्या 100 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


हेही वाचा – शिवसेना मोठ्या ताकदीने उसळी घेईल, संजय राऊतांनी बांधला चंग

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -