घरमहाराष्ट्रदृष्टी कमी झाली, बहिरेपणा आला; तुरुंगात असताना संजय राऊतांना जडल्या व्याधी

दृष्टी कमी झाली, बहिरेपणा आला; तुरुंगात असताना संजय राऊतांना जडल्या व्याधी

Subscribe

मुंबई – शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना १०२ दिवसानंतर पीएमएल कोर्टाने जामीन मंजूर केला. तब्बल १०२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना अनेक शारीरिक व्याधी जडल्याची माहिती त्यांनी दिली. तुरुंगात राहिल्यामुळे माझी दृष्टी अधू झाली, मला बहिरेपणा आला, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा – शिवसेना मोठ्या ताकदीने उसळी घेईल, संजय राऊतांनी बांधला चंग

- Advertisement -

मी पंधरा-वीस दिवस सूर्यकिरण पाहिला नाही. अंधार मी तीन महिन्यांनी पाहिला. प्रखर लाईटमध्ये कोठडीत बसावं आणि झोपावं लागत होतं. कोठडीत सहा-सात लाईट्स असतात. अंधार होत नाही तिथे, असं संजय राऊत म्हणाले.

शंभर दिवस प्रकाशात राहिल्याने माझी नजर कमी झाली. मला दिसत नाही आता. नजरेचा फार त्रास झाला. सगळं अस्पष्ट दिसतं. अशा मला बऱ्याच व्याधी झाल्या. मी हार्ट पेशंट आहे. सात स्ट्रेंट आहेत. पण मी इस्पितळात नाही गेलो. मी तिथेच सहन केलं. मला कानाने कमी ऐकू यायला लागलं. कारण आवाजच नाही. एकांतातवास काय असतो हे अनुभवलं. चारीबाजूने फक्त भिंती दिसत होत्या. त्यामुळे स्वतःशी बोलत होतो, अशा बऱ्याच गोष्टी संजय राऊत यांनी या मुलाखतीत शेअर केल्या.

- Advertisement -

हेही वाचा – तुमच्यामुळे संजय राठोडांचं करिअर बर्बाद झालं का? पत्रकाराचा प्रश्न ऐकताच चित्रा वाघ संतापल्या

तुरुंगात राहिल्याने सर्व विसरायला होतं. माणसानं सर्व विसरावं याकरताच जेलची रचना झालेली आहे. तिथं गेल्यावर सर्व विसरता यावं. मी सर्व विसरलो. मला आता मोबाईल चालवता येत नाही. मी मुलीकडून मोबाईल शिकून घेतोय, असंही संजय राऊत म्हणाले. तसंच, तुरुंगातून आल्याने माझं वजन कमी झालं, असंही संजय राऊत म्हणाले.

जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी स्थापन व्हावी

सूडाने ज्या कारवाया झाल्या आहेत त्यांना जामिनाच देत नाहीत. राजकीय सूडबुद्धीने या कारवाया केल्या जातात. राजकीय आदेशाने कारवाया केल्या जातात. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायामूर्तींची समिती स्थापन व्हावी किंवा जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी स्थापन व्हावी. सर्व पक्षीय समिती. यात विरोधी पक्षाला स्थान असायला हवं.

आदित्य ठाकरे देशाचं नेतृत्त्व

आदित्यचा हात हातात घेऊन सांगितलं की यांच्या हातात मशाल द्या. उद्धवजींनाही सांगतोय की या नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. पक्ष असाच चालणार. आम्ही चिकटून नाही चालणार. नवीन लोक पक्षात येत आहे. आदित्य ठाकरे राज्याचं नव्हे देशाचं मोठं नेतृत्त्व आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -