घरदेश-विदेशइराणमध्ये आंदोलनकर्त्यांवर अंदाधुंद गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

इराणमध्ये आंदोलनकर्त्यांवर अंदाधुंद गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

Subscribe

इराण प्रशासनने या आंदोलनाला दंगल असं संबोधलं आहे. त्यामुळे आतापर्यंत या रस्त्यांवर शेकडो आंदोलनकर्त्यांचा जीव गेला आहे. यात काही सुरक्षा रक्षकांचाही जीव गेला असल्याचा दावा इराण सरकारने केला आहे.

तेहरान – इराणच्या खुजेस्तान प्रांतातील एका बाजारात अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी आहेत.

हेही वाचा – रेल्वेगाड्यांचे गुरांपासून होणार संरक्षण, रेल्वे मंत्रालय करणार उपाययोजना

- Advertisement -

इराणची वृत्तसंस्था आयआरएनए यांनी दिलेल्या वृत्तानुसार, खुजेस्तानच्या इजेह शहरातील सेंट्रल मार्केटमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी दोन बाईकवरून येत सुरक्षारक्षक आणि आंदोलनकर्त्यांवर बेधुंद गोळीबार केला. यामुळे पाच लोकांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. मात्र, याआधी २६ ऑक्टोबर रोजी शिराजच्या शाह चेराग मकबेर येथे इस्लामिक स्टेटवर हल्ला झाला होता. या हल्ल्यातही १३ लोकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा मोदींच्या भेटीनंतर ऋषी सुनक यांनी भारताला दिलं मोठं गिफ्ट, तरुणांना होणार मोठा फायदा

- Advertisement -

इराणमध्ये १६ सप्टेंबर रोजी पोलीस चौकशीत मेहसा अमिनी हिचा मृत्यू झाला. ती तीन दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात होती. इराणच्या ड्रेस कोडच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या ताब्यात असतानाच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर गेल्या दोन महिन्यांपासून येथे आंदोलन केले जात आहे. इराण प्रशासनने या आंदोलनाला दंगल असं संबोधलं आहे. त्यामुळे आतापर्यंत या रस्त्यांवर शेकडो आंदोलनकर्त्यांचा जीव गेला आहे. यात काही सुरक्षा रक्षकांचाही जीव गेला असल्याचा दावा इराण सरकारने केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -