घरमहाराष्ट्रकोपरी पुलाच्या कामासाठी मुलुंड- ठाणे रेल्वे मार्गावरही 'या' वेळेत असेल पॉवर ब्लॉक

कोपरी पुलाच्या कामासाठी मुलुंड- ठाणे रेल्वे मार्गावरही ‘या’ वेळेत असेल पॉवर ब्लॉक

Subscribe

मध्य रेल्वे मार्गावर कर्नाक पूलाच्या पाडकामासाठी तब्बल 27 तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. युद्धपातळीवर या पुलाचे पाडकाम सुरु आहे. आत्तापर्यंत या पुलाचे 70 टक्के पाडकाम पूर्ण झाले आहे.  मात्र या ब्लॉकमुळे लोकलसह एक्स्प्रेस ट्रेनवर मोठी परिणाम जाणवत आहे. अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यात अनेक लोकल गाड्या, एक्स्प्रेस गा्डया रद्द करण्यात आल्याने प्रवासासाठी बस किंवा प्रायव्हेट वाहनांचा आधार घ्यावा लागतोय. अशात कोपरी रेल्वे पूलाच्या दुरुस्तीसाठी आज मध्य रेल्वेच्या मुलुंड आणि ठाणे दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. कोपरी रेल्वे पूल आजपासून बंद करण्यात आलं आहे. या पुलावरील मुख्य पुलावर लोखंडी गर्डर उभारणीचे काम सुरु आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मुलुंड आणि ठाणे दरम्यान कोपरी येथे सुरू होणार्‍या ROB गर्डर्ससाठी शनिवारी (19 नोव्हेंबर ) मध्यरात्री आणि रविवार/सोमवार मध्यरात्री ( 20, 21 नोव्हेंबर) विशेष पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वे 500 MT आणि 700 MT च्या दोन क्रेनच्या सहाय्याने मुलुंड आणि ठाणे दरम्यान कोपरी येथील रोड ओव्हर ब्रिजसाठी सात क्रमांकाचे गर्डर सुरू करण्यासाठी सर्व सहा मार्गांवर रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालवेल.

मेल, एक्सप्रेसवर परिणाम

ट्रेन क्रमांक-11020 कोणार्क एक्सप्रेस 03.09 ते 03.45 या वेळेत ठाणे येथे नियमित केली जाईल.

- Advertisement -

ट्रेन क्रमांक-18030 शालीमार एक्स्प्रेस ठाणे येथे 03.33 ते 03.45 या वेळेत नियमित केली जाईल, ती निर्धारित वेळेच्या 55 मिनिटे उशिरा पोहोचेल.

ट्रेन क्रमांक-१२८१० हावडा-मुंबई सीएसएमटी मेल वेळेच्या १५ ते २० मिनिटे उशिरा पोहोचेल.


‘या’ निमित्ताने उद्धव ठाकरे- प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर; राजकीय समीकरणं बदलणार?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -