घरमहाराष्ट्रमुंबई महापालिकेतील 12 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी कॅगची टीम दाखल

मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी कॅगची टीम दाखल

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेत गेल्या दोन वर्षांतील विकासकामे, कोरोनाविषयक उपाययोजना आदी बाबींवर करण्यात आलेल्या 12 हजार कोटी रुपयांच्या व्यवहारांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्याच्या तपासासाठी नियंत्रक व महालेखापरीक्षकांची (कॅग) टीम चौकशीसाठी मुंबई महापालिकेत दाखल झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तक्रारीची दखल घेऊन ही चौकशी करण्यात येत आहे.

राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुकीची शक्यता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वर्तविण्यात येत आहे. तर मुंबई महापालिकेची रखडलेली निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी लागल्याने त्याचा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बसण्याची तर त्याचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट तसेच भाजपाला मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. कॅगच्या टीमला आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करावे, असा आदेश पालिका आयुक्तांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याचे समजते.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेतील विविध विकासकामे व कोरोना कालावधीत करण्यात आलेल्या उपाययोजना यावरील कोट्यवधी रुपयांच्या खर्चात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत भाजपा व शिंदे गटाने रान उठवले होते. या प्रकरणी तक्रार नोंदवून कॅगच्या चौकशीची मागणीही करण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळच्या सुमारास कॅगच्या ८ – ९ अधिकाऱ्यांची टीम पालिका मुख्यालयात दाखल झाली होती. या टीममधील अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे काही वेळ चौकशी केल्यानंतर पालिकेमधून ते बाहर पडले. येत्या १६ डिसेंबरपूर्वी सर्व कामांचे ऑडिट केले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.

मुंबई महापालिकेमध्ये पूलांची व रस्त्यांची कामे, कोरोना उपाययोजनांवरील रुपयांचा खर्च यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप व शिंदे गटाकडून करण्यात आला होता. साधारणतः 28 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत काही कामांवर जवळजवळ 12 हजार कोटी रुपयांचा हा खर्च झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

या कामांबाबत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका –

  1. कोरोना काळात उपाययोजनांसाठी केलेला – 3,538 कोटींचा खर्च
  2. दहिसर-अजमेरा भूखंडाचा संशयास्पद व्यवहार – 339 कोटीचे प्रकरण
  3. मुंबईतील चार पुलांचे बांधकाम – 1,096 कोटी रुपये खर्च
  4. कोरोनाच्या तीन रुग्णालयांवरील – 904 कोटींचा खर्च
  5. मुंबईतील 56 रस्त्यांची दुरुस्ती कामे – 2,286 कोटी रुपये खर्च
  6. सात ठिकाणी सांडपाणी प्रकल्प – 1084 कोटी रुपये खर्च
  7. घनकचरा व्यवस्थापन – 1020 कोटी
  8. तीन मलनि:सारण प्रक्रिया केंद्र – 1187 कोटी रुपये खर्च
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -