घरमनोरंजनसंजय मिश्रा-नीना गुप्ता यांच्या 'वध' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

संजय मिश्रा-नीना गुप्ता यांच्या ‘वध’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

हा चित्रपट 9 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘वध’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याची चर्चा सर्वत्र आहे. अलीकडेच, या चित्रपटाचे पोस्टर्स देखील प्रदर्शित झाले, प्रेक्षकसुद्धा या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला असतानाच, ‘वध’या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 9 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

संजय मिश्रा यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या आहेत पण आता ‘वध’या चित्रपटातुन संजय मिश्रा एका वेगळ्याच भूमिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा उत्तम आहे कि यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या व्यक्तिरेखेत निरागसता दिसत असली तरीसुद्धा त्यांची डार्कसाइड ट्रेलरचा एक महत्वपूर्ण भाग आहे.

- Advertisement -

‘वध’ चित्रपटाबद्दल बोलताना संजय मिश्रा म्हणाले, “एक अभिनेता म्हणून मी अशा पात्राची कल्पनाही केली नव्हती, तीही नीनाजींसोबत. प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”

तर नीना गुप्ता म्हणाल्या, “‘वध’ही एक अतिशय मनोरंजक थ्रिलर कथा आहे आणि या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मी उत्तम अनुभव आला. कथा जशी दिसते त्यापेक्षा कितीतरी पटीने वेगली आहे. आणि प्रेक्षक ट्रेलर आणि चित्रपट पाहण्याचा आनंद घेतील.”

- Advertisement -

‘वध’हा चित्रपट राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधूद्वारा लिखित आणि दिग्दर्शित असून, जे स्टुडिओ आणि नेक्स्ट लेव्हल प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. तसेच, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे.


हे ही वाचा – होय, मी घटस्फोटासाठी अर्ज केला… मानसी नाईककडून शिक्कामोर्तब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -