घरमुंबईमुंबईलाही आता गोवरचा विळखा; 8 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू तर 34 रुग्णांवर उपचार...

मुंबईलाही आता गोवरचा विळखा; 8 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू तर 34 रुग्णांवर उपचार सुरु

Subscribe

महाराष्ट्राची राजधानी मुंबई देखील आता गोवर आजाराच्या विळख्यात सापडली आहे. मुंबई सातत्याने गोवरबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. मुंबई महापालिकेच्या (BMC) माहितीनुसार, मुंबईत गुरुवारी गोवरचे 19 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर आठ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी मुंबईतील नागरी आणि सरकारी रुग्णालयात किमान 34 नवीन गोवर रुग्णांना दाखल करण्यात आले, तर 36 रुग्णांना या कालावधीत डिस्चार्ज देण्यात आला, असे बीएससीने सांगितले आहे.

मुंबईतील गोवंडी भागातील गोवरग्रस्त असलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचा गुरुवारी दुपारी शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला, त्यामुळे शहरातील मृतांची संख्या यावर्षी 13 वर पोहचली आहे, यात बाहेरून आलेल्या तीन जणांचाही यात समावेश आहे. ताप, अंगावर पुरळ यासारखी लक्षणे असलेले गोवरचे 161 संशयित रुग्ण आढळले आहे. हा विषाणूजन्य आजार मुलांमध्ये अधिक सामान्य आहे.

- Advertisement -

महापालिकेने सांगितले की, गोवरग्रस्त आणखी दोन मुलं व्हेंटिलेटरवर आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबईत गोवर रुग्णांची संख्या 252 वर पोहोचली आहे. बुधवारी सायंकाळापासून 24 तासांत 10 लाखांहून अधिक घरांची तपासणी केली, 24 पैकी 11 वॉर्डातील 22 ठिकाणी गोवरचा प्रादुर्भाव आढळून आला, परंतु 19 नवीन आढळलेले रुग्ण दक्षिण मुंबईतील सी वॉर्डसह 12 वेगवेगळ्या वॉर्डातील आहेत.

सध्या शहरातील आठ रुग्णालयांमध्ये गोवर रुग्णांवर उपचार केले जात आहे. यात कस्तुरबा रुग्णालय, शिवाजी नगर प्रसूतिगृह, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, शताब्दी रुग्णालय, कुर्ला भाभा रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई रुग्णालय. फुले हॉस्पिटल, बोरिवली आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये आहेत. या रुग्णालयांमध्ये गोवर रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि आयसीयू बेडसह 330 खाटा ठेवण्यात आल्या आहेत, त्यापैकी फक्त 97 खाटा भरलेल्या आहे.


सावरकर वाद : राहुल गांधींनी केवळ एक बाजू मांडली; पृथ्वीराज चव्हाणांचे परखड मत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -