घरअर्थजगतLICच्या 'या' दोन योजना बंद; पण पैसे राहणार सुरक्षित; वाचा सविस्तर

LICच्या ‘या’ दोन योजना बंद; पण पैसे राहणार सुरक्षित; वाचा सविस्तर

Subscribe

भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी वेळोवेळी विविध विमा पाँलिसी जाहीर करते. पण अनेकदा काही अपरिहार्य कारणास्तव ती बंद करावी लागते. कंपनीने नुकतेच त्यांच्या दोन लोकप्रिय योजना बंद केल्या आहेत. जीवन अमर आणि टेक टर्म इन्शुरन्स या दोन योजनांचा त्यात समावेश आहे.

भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी वेळोवेळी विविध विमा पाँलिसी जाहीर करते. पण अनेकदा काही अपरिहार्य कारणास्तव ती बंद करावी लागते. कंपनीने नुकतेच त्यांच्या दोन लोकप्रिय योजना बंद केल्या आहेत. जीवन अमर आणि टेक टर्म इन्शुरन्स या दोन योजनांचा त्यात समावेश आहे. (insurance lic jeevan amar tech term insurance plan new jeevan amar new tech term)

एलआयसी टेक टर्म ही ऑनलाइन पॉलिसी होती. तर एलआयसी जीवन अमर ऑफलाइन होती. LIC च्या परिपत्रकात म्हटले आहे की 23 नोव्हेंबर 2022 पासून दोन्ही मुदतीच्या योजना मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्विमा दर वाढल्यामुळे मुदत योजना मागे घेण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

जीवन अमर योजना ऑगस्ट 2019 मध्ये आणि टेक टर्म प्लॅन सप्टेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. लॉन्च झाल्यापासून या योजनांचे प्रीमियम दर वाढवले गेले नाहीत. कंपनीने नवीन सुधारणांसह नवीन योजना लॉन्च केल्या आहेत.

दोन्ही पॉलिसी त्यांच्या सेवेच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा रक्कम देतात आणि 10 ते 40 वर्षांची पॉलिसी मुदत देतात. LIC जीवन अमर प्लॅनसह किमान 25 लाखांचा विमा उतरवला जाऊ शकतो. LIC टेक टर्म प्लॅनसह किमान 50 लाखांचा विमा घेतला जाऊ शकतो. या दोन्ही योजनांमध्ये पैसे गुंतवण्याची कमाल मर्यादा नव्हती. तसेच, एलआयसी टेक टर्म प्लॅन एलआयसी जीवन अमरपेक्षा स्वस्त होता.

- Advertisement -

विद्यमान LIC टर्म प्लॅन पॉलिसीधारकांनी त्यांच्या गुंतवणुकीबद्दल अजिबात चिंता करू नये. त्यांनी एलआयसी टेक टर्म किंवा एलआयसी जीवन अमर योजना खरेदी केली असली तरीही त्यांच्या विद्यमान योजना सुरू राहतील. बंद केलेल्या उत्पादनाचा अर्थ असा होतो की ते भविष्यातील विक्रीसाठी बंद केले आहे. ज्या खरेदीदारांनी या मुदतीच्या विमा योजनांतर्गत विमा पॉलिसींसाठी 22 नोव्हेंबरपर्यंत अर्ज केला आहे, जर त्यांचा प्रस्ताव 30 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारला गेला तर त्यांना या योजना दिल्या जातील.

जीवन अमर आणि टेक टर्म नवीन पद्धतीने लाँच केले आहे. त्यांना न्यू जीवन अमर आणि न्यू टेक टर्म अशी नावे देण्यात आली आहेत. नवीन जीवन अमर आणि टेक टर्म नॉन-लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपेट प्लॅन्स आहेत, याचा अर्थ पॉलिसीधारक निश्चित प्रीमियम भरतात आणि हमी परतावा मिळवतात. नॉन-लिंक्ड योजना ही कमी जोखमीची उत्पादने आहेत. त्यांचा शेअर बाजाराशी संबंध नाही.

नवीन जीवन अमर योजनेअंतर्गत महिलांना विशेष दर मिळू शकतात. एलआयसीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, धूम्रपान न करणाऱ्या आणि धूम्रपान करणाऱ्यांसाठी प्रीमियमचे दर वेगळे आहेत. सिंगल प्रीमियम प्लॅन अंतर्गत किमान प्रीमियम रुपये ३०,००० आहे.


हेही वाचा – …तर गद्दारांनी सांगावे भाजपाच्या तिकिटावर लढणार नाही, उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आवाहन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -