हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध ‘झलक दिखला जा 10’ हा कार्यक्रम मागील अनेक दिवसांपासून चर्तेत आहे. नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. गुंजन सिन्हाने ‘झलक दिखला जा 10’चे विजेते पद मिळवलं आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, करण जौहर, टेरेंस लुईस आणि नोरा फतेही यांच्याहस्ते गुंजनला 20 लाख आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं. नुकतेच या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
View this post on Instagram
8 वर्षांची गुंजन सिन्हा गुवाहाटी येथील आहे. तेजस वर्मा आणि सागर बोरा हे तिचे कोरियोग्राफर आहेत. या कार्यक्रमातील अनेक तगड्या कलाकारांना मागे सारत गुंजनने सर्वांनाच आश्चर्यचकित करुन टाकलं. गुंजनने याआधी देखील इतर डान्स रियालिटी शोमध्ये पाहिलं आहे. तिच्या डान्सचे अनेक चाहते आहेत.
गुंजन शाळेत जाण्यासाठी उत्सुक
आता गुंजन डान्ससोबतच अभ्यासावर देखील लक्ष केंद्रित करणार आहे. तिला तिच्या शाळेमध्ये जाण्याची खूप उत्सुकता लागून राहिली आहे. ती तिच्या शाळेतील मित्र-मैत्रिणींना आणि शिक्षकांना भेटण्यासाठी उत्सुक आहे.
हेही वाचा :