घरदेश-विदेशशत्रूंच्या ड्रोनविरोधात कारवाईसाठी गरुडांना प्रशिक्षण, भारतीय लष्कराची नवी शक्कल

शत्रूंच्या ड्रोनविरोधात कारवाईसाठी गरुडांना प्रशिक्षण, भारतीय लष्कराची नवी शक्कल

Subscribe

आपल्या मजबूत पंजा आणि पंखांचा वापर करून आपल्या शत्रूंवर वार करणे हा गरुडाचा विशेष गुण असतो. त्यामुळे गरुड पक्षी नैसर्गिकरित्याच ड्रोनविरोधी काम करू शकतात.

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून भारतीय हद्दीत ड्रोनच्या घिरट्या वाढत आहेत. शत्रू राष्ट्रांकडून भारतात देखरेख करण्यासाठी या ड्रोन्सचा वापर केला जातो. या ड्रोनचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने नवी युक्ती लढवली आहे. ड्रोनप्रतिबंधक कारवायांसाठी भारतीय लष्कराने गरुड पक्षाला प्रशिक्षित केलं आहे. प्रशिक्षित गरुड पक्षी शत्रूंच्या ड्रोनवर हल्ला करून ड्रोन पाडतील. भारतीय सेनाच्या मेरठ येथील रीमाऊंट वेटरिनरी कोरमध्ये अशा गरुडांना ट्रेन केलं जातंय. उत्तराखंडच्या औलीमध्ये भारतीय सेना आणि अमेरिकी सेनेकडून सुरू असलेल्या युद्धाभ्यासाअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात येतंय.

हेही वाचा – ‘या’ शिफारशीमुळे नवज्योतसिंग सिद्धू यांची तुरुंगातून होणार सुटका?

- Advertisement -

अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाभ्यासादरम्यान प्रशिक्षित गरुड आणि प्रशिक्षित श्वान मिळून ड्रोनविरोधात कसा सामना करतात याचं संशोधन सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मेरठच्या रीमाऊंट वेटरिनरी कोरमध्ये गरुडांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे. त्यांचं प्रशिक्षण आता पूर्ण झालं आहे. ते आता त्यांच्या मिशनसाठी तयार आहेत. आपल्या मजबूत पंजा आणि पंखांचा वापर करून आपल्या शत्रूंवर वार करणे हा गरुडाचा विशेष गुण असतो. त्यामुळे गरुड पक्षी नैसर्गिकरित्याच ड्रोनविरोधी काम करू शकतात.

ड्रोनविरोधी काम कसं असेल?

  • भारतीय सेनेचे प्रशिक्षित श्वान आणि प्रशिक्षित गरुड ड्रोनचा शोध घेतील आणि नष्ट करतील.
  • श्वानाची सुक्ष्म ऐकू येण्याची क्षमता आणि गरुडाची भेदक नजर यामुळे भारतात शिरलेल्या ड्रोनची लागलीच ओळख पटेल.
  • मानवी कर्णपटलांना जे ध्वनी ऐकू येत नाहीत, ते ध्वनी श्वान सहज ऐकू शकतात.
  • त्यामुळे भारतीय हद्दीत आलेले ड्रोन श्वानांना लागलीच कळू शकतील.
  • आवाज ऐकू आल्यानंतर गरुड त्या दिशेने जातील आणि त्यांच्या भेदक नजरेने ड्रोनला पाडू शकतील.
  • पापणी लवण्याच्या आतच गरुड या ड्रोनचा खात्मा करू शकतो.
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -