घरमहाराष्ट्रनागपूरमहाराष्ट्रात सोन्याच्या खाणी? चंद्रपूर, सिंधुदुर्गात खनिकर्म विभागाकडून शोधकाम सुरू

महाराष्ट्रात सोन्याच्या खाणी? चंद्रपूर, सिंधुदुर्गात खनिकर्म विभागाकडून शोधकाम सुरू

Subscribe

चंद्रपूर – भारतातून एकेकाळी सोन्याचा धूर निघत असे, असं पालुपद आपण कित्येक वर्षे ऐकत आहोत. मात्र, असं असतानाही भारतात सोन्याची किंमत गगनाला पोहोचत आहे. दरम्यान, महाराष्ट्रासाठी आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी भागात सोन्याच्या खाणी असल्याचा अहवाल केंद्रीय खनिकर्म विभागाच्या अहवालात म्हटलं आहे. तर, याबाबत राज्याच्या खनिकर्म विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. तसंच, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत ओझरता खुलासा केला होता. त्यामुळे महाराष्ट्रात खरंच सोन्याच्या खाणी आहेत का, याबाबत आता खनिकर्म विभागाकडून चाचणी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा – माझं रक्त शिवसेनेचं, उद्धव ठाकरेंसोबतच…, मनोहर जोशींनी केलं स्पष्ट

- Advertisement -

राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेत केला होता. राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला खूप मोठा वावा असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वांत मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वास आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्याच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, आयर्न यासारख्या खनिजांबरोबर सोनेही लपले आहे. चंद्रपूरच्या मिंझरी आणि बामणी या भागात जिथे सोने मोठ्या प्रमाणात मिळू शकतं तिथे तांबेही आढळत आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाच्या अहवालात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादीला देणार का? जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल

सिंधुदुर्गातही खाण

कोकणातील सिंधुदुर्गातही सोन्याच्या खाणी असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तिथेही खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -