घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररिक्षाचे मीटर ‘डाऊन’च, मीटरसक्तीला दोन महिन्याची मुदतवाढ

रिक्षाचे मीटर ‘डाऊन’च, मीटरसक्तीला दोन महिन्याची मुदतवाढ

Subscribe

नाशिक : शहरात अवघी मीटर दुरुस्तीचे सहाच दुकाने असल्याने सर्वच रिक्षांचे मीटर अपडेट करणे एक डिसेंबरपर्यंत शक्य नसल्याने मुदतवाढीची मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सुनील बागुल व श्रमिक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भगवंत पाठक यांनी जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन आधिकार्‍यांना दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी अपडेटेड मीटरसाठी दोन महिन्याभराची मुदत दिली आहे. मात्र, रिक्षाचालकांना एक फेब्रुवारीपर्यंत रिक्षाला मीटर बसवावे लागणार आहेत.

नाशिक शहरात 12 हजाराहून अधिक रिक्षा आहेत. अनेकदा रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारात असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती असल्याने रिक्षा भाडे मीटरप्रमाणे आकारण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेण्यात आला होता. त्या संबंधीच्या सूचना जिल्ह्याच्या वाहतूक विभागाला देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गुरुवार(दि.१)पासून रिक्षाभाडे मीटरप्रमाणे आकारण्यात येणार होते. मात्र, शहरात रिक्षाचे मीटर दुरुस्त करणार्‍यांची संख्या अवघी सहाच असल्याने अनेक रिक्षांचे मीटर दुरुस्त झालेले नाहीत. त्यामुळे गुरुवारपासून मीटरप्रमाणे भाडे आकारणे अशक्य असल्याने या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान मीटर दुरुस्तीसाठी दोन महिने मुदतवाढ देण्यात आला आहे. फेब्रुवारीमध्ये अंमलबाजवणीला केली जाणार आहे.

- Advertisement -

नाशिक शहरातील सर्वच रिक्षांचे मीटर अपडेट करणे एक डिसेंबरपर्यंत अशक्य असून मीटर दुरुस्त करणारे अधिकृत सहाच दुकानदार असल्याचे निवेदन ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सुनील बागुल व श्रमिक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भगवंत पाठक यांनी जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन आधिकार्‍यांना दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी अपडेटेड मीटरसाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे नाशिककरांसह रिक्षाचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. रिक्षाचालकांना एक फेब्रुवारीपर्यंत रिक्षाला मीटर बसवावेच लागणार आहे.

मीटरप्रमाणे भाडे आकारणीचा निर्णयाचे स्वागतार्ह आहे. परंतु, रिक्षांचे मीटरप्रमाणे भाडे आकारणीसाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. मीटरप्रमाणे भाडे आकारणी झाली तर यात रिक्षाचालक आणि मालक यांचा फायदा होईल. : मामा राजवाडे, महानगर प्रमुख, श्रमिक सेना, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -