घरक्राइमविकृतपणाचा कळस, 100 महिलांचा विनयभंग केल्याची पैलवानाकडून कबुली

विकृतपणाचा कळस, 100 महिलांचा विनयभंग केल्याची पैलवानाकडून कबुली

Subscribe

महिलांच्या विनयभंगाप्रकरणी अटकेतील आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांना धक्का बसला आहे. पैलवान असलेल्या आरोपीने तब्बल 100 महिलांचा विनयभंग केल्याची कबुली दिली आहे. संबंधित आरोपी हा राज्यस्तरीय कुस्तीपटू आहे. एका योग शिक्षिकेच्या तक्रारीनंतर राजकोट पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर आरोपीच्या विकृतपणाचा खुलासा झाला आहे. कौशल पिपालिया असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपी कौशल पिपालिया याने 2016, 2017, 2018 आणि 2019 मध्ये राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये 74 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. मात्र योगा शिक्षिकेच्या विनयभंगानंतर आरोपी 10 दिवस पोलिसांना गुंगारा देत पळत होता.

- Advertisement -

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, विनयभंगाप्रकरणी पीडितेने मालवीयनगर पोलीस ठाण्यात 23 नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार, पीडित महिला दुचाकी पार्क करत लिफ्टने वरील मजल्यावर जात होती, यावेळी पीडितेने पार्क केलेल्या पार्किंग ठिकाणी एक व्यक्ती बसली होती.हा व्यक्ती देखील पीडितेच्या पाठोपाठ लिफ्टमध्ये शिरला आणि त्य दरवाजा अडवला. यानंतर लिफ्टमध्ये त्याने पँट काढत तिच्यासमोर अश्लील हावभाव केले. यावेळी पीडित महिलेने त्याला फटकारत लिफ्टमधून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. यात आरोपीने पीडितेला कानाखाली लगावत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या धक्कादायक अनुभवामुळे धास्तावलेल्या महिलेने मदतीसाठी आराडाओरडा सुरु केला, मात्र आरोपीने तोपर्यंत घटना स्थळावरून पळ काढला.

मालवीयनगरचे पोलीस निरीक्षक आय.एन.सावलिया म्हणाले की, आरोपी पिपलियाने सुमारे 100 महिलांचा अशाप्रकारे विनयभंग केल्याचे कबुल केले आहे. या कृत्यामुळे त्याला आनंद मिळत होता. मात्र त्याच्याविरोधात पीडित महिलांनी तक्रार करणे टाळले आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पिपलिया बाईक चालवताना महिलांच्या कानशिलात मारत पळून जात होता. यासाठी तो कुप्रसिद्ध होता, अशी माहितीही पोलिसांनी दिला आहे. यापूर्वी त्याला चोरी शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.


अजित पवारांच्या पक्षप्रवेशाच्या ऑफरवर वसंत मोरेंचे स्पष्टीकरण, म्हणाले ‘ते वेळच ठरवेल’

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -