घरमुंबईमहापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर, शिवाजी पार्क परिसर तात्पुरता फेरीवालामुक्त

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर, शिवाजी पार्क परिसर तात्पुरता फेरीवालामुक्त

Subscribe

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन,

मुंबई  -: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी आहे. यानिमित्ताने दादर, शिवाजी पार्क, चैत्यभूमी, इंदू मिल परिसरात मुंबई व बाहेरून लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर येणार आहेत. त्यामुळे दादर, शिवाजी पार्क परिसरात रस्ते, पदपथ याठिकाणी फेरीवाले व त्यांच्याकडे होणारी खरेदीदारांची रोजची गर्दी कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने दादर परिसरातील फेरीवाल्यांना सध्या व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. तरीही रस्ते, पदपथ याठिकाणी बसलेल्या फेरीवाल्यांवर सोमवारी सकाळपासूनच पालिकेच्या पथकाने कडक कारवाई करून त्यांचा माल जप्त केला.त्यामुळे दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

६ डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे चैत्यभूमी, दादर, शिवाजी पार्क आदी परिसरात देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी एक – दोन दिवस अगोदरपासूनच गर्दी करण्यास सुरुवात करतात. महापरिनिर्वाण दिनासाठी येणारे भन्ते, अनुयायी आदींसाठी आरोग्य, पाणी, रुग्णवाहिका, अग्निशमन, मंडप, शामियाना, स्टोल्स, विद्युत व्यवस्था आदी सेवासुविधा देण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे.

- Advertisement -

वास्तविक, दादर, शिवाजी पार्क, रेल्वे स्थानक आदी परिसरात दररोज भाजीपाला, हारफुले, कपडे, विविध वस्तू आदी खरेदीसाठी शेकडोंच्या संख्येने सकाळपासून रात्रीपर्यन्त गर्दी करतात. या गर्दीमुळे, फेरीवाल्यांमुळे नागरिक अगोदरच हैराण झाले आहेत. त्यातच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनासाठी ६ डिसेंबरला आणि त्याअगोदर पासूनच दादर, चैत्यभूमी, रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली जाते.

दरवर्षीचा हा अनुभव पाहता पालिकेने यंदा महापरिनिर्वाण दिनाच्या दोन दिवस अगोदरपासूनच फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली आहे. मात्र तरीही काही ठिकाणी हारफुलें विक्रेते, भाजी, फळे, वडापाव, खाद्यपदार्थ विक्रेते हे बसलेले आढळून आल्याने पालिकेच्या पथकाने सोमवारी सकाळपासूनच आंबेडकरी साहित्य, हारफुलें, फळे विक्रेते वगळता वडापाव, खाद्यपदार्थ व वस्तू विक्रेत्या फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचा माल, बाकडे, गॅस इतर वस्तू जप्त केल्या. त्यामुळे सोमवारी दादर रेल्वे स्थानक, शिवाजी पार्क, चैत्यभूमी परिसर फेरीवाला मुक्त झाल्याचे चित्र दुपारच्या सुमारास आढळून आले.


आलेले उद्योग घालवले आणि सरकारचे आता नको ते उद्योग सुरू; अजित पवारांचा घणाघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -