घरताज्या घडामोडीवादात लक्ष घालण्याचे शहा यांचे आश्वासन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

वादात लक्ष घालण्याचे शहा यांचे आश्वासन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Subscribe

कर्नाटक प्रकरणी अमित शहांशी चर्चा

मुंबई : कर्नाटकातील मराठी भाषिक बेळगावमध्ये स्थानिक कन्नड कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील गाडयांना लक्ष्य केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या प्रश्नी शहा यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तर महाराष्ट्रातील जनतेला त्रास होऊ नये तसेच हल्लेखोरांवर कारवाईची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे. त्यांनी ती मान्य केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

आपण कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगून शिंदे म्हणाले, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद हा सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये. तसेच दोन्ही राज्यातील नागरिकांना त्रास होऊ नये. महाराष्ट्राच्या वाहनांवर जे हल्ले झाले त्या प्रकरणी दोषी असणा-यांवर कारवाई करण्याची मागणी आपण केली असून ती त्यांनी मान्य केल्याचे शिंदे म्हणाले.

- Advertisement -

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगा : फडणवीस यांची अमित शहांना विनंती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आपण दूरध्वनीवर चर्चा केली. सीमाप्रश्नावर अलिकडच्या काळातील संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. विनाकारण महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ले योग्य नाहीत. दोन राज्यात अशाप्रकारचे वातावरण असू नये, असे आपण त्यांना सांगितले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी माझा काल झालेला संवाद सुद्धा त्यांच्या कानावर टाकला आहे. तेथील मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासित केले आहेच. पण, तरी त्यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावे, अशी विनंती आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना केली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.


सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कर्नाटक बँकेतून; राज्य सरकारचा कर्नाटक बँकेशी स्वतंत्र करार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -