घरमुंबईघाटकोपरमध्ये ब्रिटिशकालीन जलवाहिनी फुटली, रस्त्यांना नद्याचे स्वरुप

घाटकोपरमध्ये ब्रिटिशकालीन जलवाहिनी फुटली, रस्त्यांना नद्याचे स्वरुप

Subscribe

मुंबई  – घाटकोपमध्ये ब्रिटिशकालीन जलवाहिनी पहाटे २.३० वाजच्या दरम्यान फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. तसेच, आजूबाजूच्या घरांचे आणि दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घाटकोपरमध्ये असल्फा विभागात जलवाहिनी फुटल्याने रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झालं आहे. जलवाहिनी फुटल्याने ४०० घरांत पाणी शिरले आहे.


असल्फा विभागात ब्रिटीशकालीन ७२ इंचाची जलवाहिनी आहे. ब्रिटिशकालीन असल्याने ही जलवाहिनी अत्यंत जीर्ण झाली आहे. त्यामुळे सातत्याने ही जलवाहिनी फुटत असते. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना सतत मनस्तापाला समोरे जावे लागते. ३० डिसेंबर रोजी रात्री अचानक जलवाहिनी फुटल्याने नागरिक घाबरले होते. पाण्याचा प्रवाह इतका होता की अनेक घरात पाणी शिरले. रस्ते जलमय झाले. १० फुटापर्यंत या जलवाहितून पाणी उसळत होते इतका पाण्याचा दाब होता.

- Advertisement -

मध्यरात्री जलवाहिनी फुटल्याची माहिती मुंबई महापालिकेला कळवण्यात आली होती. मात्र, पालिकेचे अद्यापही तेथे पोहोचले नसल्याची माहिती आहे. तसंच, पाण्याचा प्रवाह अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे लोक घरातून पाणी ओसरण्याची वाट पाहत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -