घरमुंबईपोलिसांसाठी खूशखबर, राज्य सरकारकडून गणवेश भत्त्यात वाढ

पोलिसांसाठी खूशखबर, राज्य सरकारकडून गणवेश भत्त्यात वाढ

Subscribe

Uniform Allowance | वाढीव अनुदानाचा निर्णय १ जानेवारी २०२३ पासून लागू झाला आहे. त्यामुळे यापुढे गणवेश भत्ता पोलिसांना सहा हजार रुपये मिळणार आहे.

Uniform Allowance | मुंबई – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ (Increase in Uniform Allowance) करण्यात आली आहे. पूर्वी गणवेश भत्ता ५ हजार रुपये होते. गृहविभागाने गणवेश भत्त्यात एक हजारांची वाढ करून सहा हजार रुपये भत्ता केला आहे. यामुळे पोलीस उपनिरिक्षक ते अप पोलीस अधिक्षक या अधिकाऱ्यांना फायदा होणार आहे.

हेही वाचा – काळजी घ्या! परदेशातून आलेल्या प्रवाशांकडून भारतात आले कोरोनाचे ११ उपप्रकार

- Advertisement -

पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्यासंदर्भात गृह विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. पूर्वी पोलिसांना विभागाकडून भत्ता न देता गणवेश दिला जायचा. मात्र, २०२१ मध्ये ती पद्धत बंद करून गणवेश भत्ता देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी ५ हजार रुपये गणवेश भत्ता मिळत असे. परंतु, आता या भत्त्यात वाढ करण्यात आली असून सहा हजार रुपये गणवेश भत्ता दिला जाणार आहे.

वाढीव अनुदानाचा निर्णय १ जानेवारी २०२३ पासून लागू झाला आहे. त्यामुळे यापुढे गणवेश भत्ता पोलिसांना सहा हजार रुपये मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – खोटं बोलून कसा खेळ…; डिलीट ट्वीटवरून जितेंद्र आव्हाडांची सारवासारव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -