घरताज्या घडामोडीखोकल्याची 'ही' औषधं मुलांना देत असाल तर सावधान! WHOने दिला इशारा, म्हणाले...

खोकल्याची ‘ही’ औषधं मुलांना देत असाल तर सावधान! WHOने दिला इशारा, म्हणाले…

Subscribe

काही दिवसांपूर्वी खोकल्याची औषध दिल्याने 19 लहान मुलांचा मृत्यू झाला होता. उझबेकिस्तानमध्ये ही घटना घडली असून, मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या मूळच्या भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता.

काही दिवसांपूर्वी खोकल्याची औषध दिल्याने 19 लहान मुलांचा मृत्यू झाला होता. उझबेकिस्तानमध्ये ही घटना घडली असून, मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या मूळच्या भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दोन कफ सिरप लहान मुलांना देऊ नये, असे आवाहन केले आहे. (Due To Uzbekistan Children Death Case Two Cough Syrups Made By India Marion Biotech Should Not Be Used For Children Said Who)

मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही मुळची भारतातील उत्तर प्रदेशात आहे. या कंपनीकडून Ambronol आणि DOK-1 Max या दोन कफ सिरपचे उत्पादन घेतले जाते. याच दोन फक सिरपची चाचणी केल्यानंतर यामध्ये डायइथिलीन ग्लायकोल तसेच इथिलीन ग्लायकोल हे घटक योग्य प्रमाणात नसल्याचे समोर आले आहे. या दोन औषधांची केलेल्या चाचणीनंतर जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांना मारयॉन बायोटेक या कंपनीचे दोन कफ सिरप देऊ नये, असे आवाहन केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, उझबेकिस्तानमध्ये डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मारियॉन बायोटेक या कंपनीने निर्माण केलेल्या कफ सिरपचे सेवन केल्यामुळे 19 मुलांचा मृत्यू झाला होता. श्वसनाचा विकार जडल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून डॉक-1 मॅक्स सायरप (Dok-1 Max Syrup) देण्यात आले होते.

मुलांना 2 ते 7 दिवस हे औषध दिवसातून 3 ते 4 वेळा देण्यात आले होते. प्रमाणापेक्षा जास्त औषध दिल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने घेतली होती.

- Advertisement -

हेही वाचा – डाव्होसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री सहभागी होणार; महाराष्ट्राचे व्हिजन मांडणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -