घरमनोरंजन'पठाण'सह चित्रपटगृहात पाहायला मिळणार रणबीर आणि श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार'चा ट्रेलर

‘पठाण’सह चित्रपटगृहात पाहायला मिळणार रणबीर आणि श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर

Subscribe

‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘दे दे प्यार दे’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे लव रंजन हे आजच्या काळात प्रेम आणि नातेसंबंधांना धरून आपल्या अनोख्या अंदाजसाठी ओळखले जातात. तसेच, त्यांच्या चित्रपटांमध्ये एक गोष्ट कायम पाहायला मिळते ती म्हणजे सुंदर सेट्स आणि सुंदर आऊटडोर लोकेशन्स. अशातच, त्यांचा आगामी चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कार’चे चित्रीकरण देखील काही अविस्मरणीय लोकेशन्सवर झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लव रंजनने चित्रपटाचे काही शूटिंग दिल्लीत केले असून चित्रपटाचा मोठा भाग स्पेनमध्ये शूट करण्यात आला आहे. तसेच, या सिनेमात रणबीर आणि श्रद्धा हे दोघेही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असून, याची झलक प्रेक्षकांना टायटल अनाउंसर व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

सूत्रांनुसारच्या माहितीनुसार, ‘तू झूठी मैं मक्कार’या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर लवकरच लॉन्च होणार आहे. ट्रेलरला व्हायआरएफ (YRF)द्वारा पठाणसोबत जोडले जाईल, जे दोन्ही चित्रपटांचे डिस्ट्रीब्यूशन हाताळत आहेत.

- Advertisement -

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.


हेही वाचा :

मला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी; उर्फी जावेदने महिला आयोगाकडे पाठवलं पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -