घरदेश-विदेशपाकिस्तानस्थित अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, भारताकडून स्वागत

पाकिस्तानस्थित अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, भारताकडून स्वागत

Subscribe

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) सोमवारी पाकिस्तानस्थित दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला त्यांच्या आयएसआयएल (दाएश) आणि अल-कायदा प्रतिबंधक समितीअंतर्गत जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. यूएनएससीने घेतलेल्या या निर्णयाबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आनंद व्यक्त केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, आयएसआयएल आणि अल कायदा प्रतिबंध समितीने लष्कराचा दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून नियुक्त करण्याच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

- Advertisement -

विशेष म्हणजे, अब्दुल रहमान मक्की हा लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा मेहुणाही आहे. एवढेच नाही तर, मक्कीने लष्कर-ए-तोयबासाठी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. यामध्ये विविध मार्गांनी संस्थेसाठी निधी उभारणे देखील समाविष्ट आहे.

- Advertisement -

यूएनएससीने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, या क्षेत्रात दहशतवादी संघटनांचा धोका कायम आहे. अशा धोक्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने तसेच दहशतवादी तळांना नष्ट करण्याच्या दृष्टीने यूएनएससीतर्फे तयार करण्यात येणारी यादी आणि प्रतिबंध हे प्रभावी साधन आहे.

दहशतवादाबाबत ‘झीरो टॉलरन्स’ची भूमिका कायम ठेवण्यास भारत कटिबद्ध आहे. दहशतवादाविरुद्ध आश्वासक आणि अपरिवर्तनीय कारवाई करण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय समुदायावर दबाव आणत राहील. आम्ही कोणत्याही दहशतवादी कारवाया सहन करणार नाही, असेही अरिंदम बागची यांनी स्पष्ट केले.

कोण आहे अब्दुल रहमान मक्की?
अब्दुल रहमानी मक्की हा 26/11च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा सदस्य आहे. अहल-ए-हदीस या पाकिस्तान इस्लामिक वेल्फेअर ऑर्गनायझेशनव्यतिरिक्त, लष्कर-ए-तोयबावर देखील मक्कीचा प्रभाव आहे. मक्की हाफीज हा सईदचा सर्वात खास नातेवाईक असून हाफीजच्या कृष्णकृत्यात त्याला नेहमी निष्ठेने साथ दिली. भारताविरुद्ध कट रचण्यात मक्की नेहमीच पुढे असतो. मक्कीने मुंबईत दहशत माजवण्याचा खतरनाक कटही रचला होता. भारतात, विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये निधी गोळा करण्यासाठी, भारतात हल्ल्यांची योजना अंमलात आणण्यासाठी तरुणांची भरती करण्यात आणि त्यांना कट्टरपंथी बनवण्यात त्याचा सहभाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -