घरदेश-विदेशअल्पसंख्याक समाजाबाबत बेछूट विधानं करू नका; पंतप्रधान मोदींची नेत्यांना सूचना

अल्पसंख्याक समाजाबाबत बेछूट विधानं करू नका; पंतप्रधान मोदींची नेत्यांना सूचना

Subscribe

महाराष्ट्रात एकीकडे महापुरुषांचा अपमान, महिलांचा अपमान यावरून भाजप नेते आणि राज्यापाल भगतसिंह कोश्यारींविरोधात विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विरोधकांनी थेट राज्यपालांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. अशात आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक मंगळवारी संपली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्याक समाजाबद्दल पक्षातील नेत्यांना एक मोठा सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदींनी पक्षातील नेत्यांना अल्पसंख्याक समाजाबाबत बोलताना बेछूट वक्तव्य टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी एका वृत्तसंस्थेला मोदींच्या बैठकीतील ही माहिती दिली आहे.

भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मुख्तार अब्बास नक्वी यांनी पक्षाच्या नेत्यांनी अल्पसंख्याकांवर वक्तव्य केल्याबद्दल पंतप्रधानांच्या टिप्पणीला पुष्टी दिली. नक्वी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी अश सुचना पहिल्यांदाच दिलेल्या नाही. पंतप्रधान मोदी सतत अल्पसंख्याकांबद्दल बोलतात. आमच्यासाठी अल्पसंख्याक किंवा बहुसंख्य असं कोणी नाही.

- Advertisement -

नक्वी पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधान करणाऱ्यांना कडक इशारा देत कारवाई देखील केली आहे. तसेच त्यांना पुन्हा वादग्रस्त विधानं टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नक्वी म्हणाले की, धर्मनिरपेक्ष गटाच्या लोकांनीही उघडपणे पुढे यायला हवे. यात सिर तन से जुदा, अशी विधानं करणाऱ्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी किंवा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव का बोलत नाहीत? असा सवालही त्यानी केला आहे.

- Advertisement -

‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हा आमच्या सरकारचा नारा असल्याचे म्हणत पशमांडा मुस्लिम समाजासारख्या मागासलेल्या लोकांना बळ देण्याचे कामही भाजप करत असल्याचा दावा नक्वी यांनी केला आहे.


भाजपची हुकूमशाही व्यवस्था संपवण्यासाठी मविआ एकत्र; नाना पटोलेंचा निर्धार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -