घरताज्या घडामोडीमी चौकशीसाठी तयार, लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांवर बृजभूषण सिंहांची प्रतिक्रिया

मी चौकशीसाठी तयार, लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांवर बृजभूषण सिंहांची प्रतिक्रिया

Subscribe

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. भारतातील दिग्गज कुस्तीपटू दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात भारतीय कुस्ती महासंघाविरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान, लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांवर बृजभूषण सिंहांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माझं स्वतःचं यामध्ये नाव आल्यानं मी याप्रकरणी कारवाई कशी करु शकतो?, तसेच मी याप्रकरणी चौकशीसाठी तयार आहे, असं बृजभूषण सिंह म्हणाले.

- Advertisement -

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. कुस्ती फेडेरशन कुस्तीपटूंच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत असून त्रास देत आहे. सोबत कुस्तीपटूंचा छळ केला जात आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटूंना फिजिओथेरपिस्ट आणि कोचही दिला गेला नाही, असा आरोप कुस्तीपटू करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान पुरुष प्रशिक्षकांकडून महिला कुस्तीपटूंना आणि महिला प्रशिक्षकांना त्रास दिला जात आहे. तसेच फेडरेशनच्या मर्जीतले प्रशिक्षकांकडून महिला प्रशिक्षकांशी गैरवर्तन केलं जात आहे. महिला कुस्तीपटूंचे कुस्ती अध्यक्षांकडून शोषण होत आहे. खेळाडूंवर कोणतेही कारण नसताना बंदी घातली जात आहे, असे गंभीर आरोप कुस्तीपटू विनेश फोगाट हिने केले आहेत.


हेही वाचा : बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; कुस्तीपटूंच दिल्लीत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -