घरताज्या घडामोडीआर्थिक मंदीमुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात

आर्थिक मंदीमुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात

Subscribe

जगभरातील अनेक कंपन्यांनी आर्थिक मंदीमुळे कर्मचारी कपात करण्यास सुरू केली आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. अशातच पुन्हा एकदा प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे.

जगभरातील अनेक कंपन्यांनी आर्थिक मंदीमुळे कर्मचारी कपात करण्यास सुरू केली आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. अशातच पुन्हा एकदा प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. आर्थिक संकटाचे कारण पुढे करत मायक्रोसॉफ्ट कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट कंपनीने बुधवारी सांगितले की आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस 10,000 नोकर्‍या कमी करण्यात येणार आहेत. कंपन्यांना आर्थिक मंदीच्या काळात सामोरे जावे लागत असल्याने अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रातील टाळेबंदीच्या तेजीचे हे लक्षण मानले जाऊ शकते.

- Advertisement -

दरम्यान, मायक्रोसॉफ्ट कंपनीने गतवर्षी जुलै महिन्यात काही लहान नोकऱ्या काढून टाकण्यात आल्या असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये Axios कंपनीने विविध विभागांमध्ये सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. सत्या नडेला यांच्या नेतृत्वाखालील फर्मला पर्सनल कॉम्प्युटर मार्केटमध्ये मंदीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विंडोज आणि त्यासोबत असलेल्या सॉफ्टवेअरला फारशी मागणी नाही.

गतवर्षी जून तिमाहीच्या अखेरीस कंपनीकडे सुमारे 2,21,000 कामगार होते. त्यापैकी सुमारे 1,22,000 यूएस आणि उर्वरित इतर देशांमध्ये होते. कंपनीच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कपात कायम राहण्याची शक्यता आहे. अलीकडेच, मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी तंत्रज्ञान क्षेत्रासाठी दोन वर्षांसाठी आव्हानांचा इशारा दिला होता. मायक्रोसॉफ्टलाही या आव्हानांचा सामना करावा लागणार असून तंत्रज्ञान कंपन्यांनी कार्यक्षम बनण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

गतवर्षी देखील मायक्रोसॉफ्ट कंपनीने कर्मचारी कपात केली होती. त्यावेळी पर्सनल कॉम्प्युटर मार्केट घसरत असल्यामुळे विंडोज आणि डिव्हाइसच्या विक्रीला त्याचा फटका बसला होता. फटका बसल्यामुळे कंपनीवर आपल्या क्लाउड युनिट Azure मध्ये वाढीचा दर कायम ठेवण्याचा दबाव होता.


हेही वाचा – PM Modi Mumbai Visit : उद्या मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल, ‘या’ मार्गांचा करा वापर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -