घरठाणेमाघी गणपतीसाठी मूर्तिकारांची लगबग

माघी गणपतीसाठी मूर्तिकारांची लगबग

Subscribe

भिवंडी । माघ महिन्यातील विनायकी चतुर्थीच्या दिवशी अनेकांच्या घरी नवसाचे गणपती म्हणून मूर्तिपूजन केले जाते. पुढील आठवड्यात हा गणेशोत्सव साजरा होणार असल्याने भिवंडीतील गणेशमूर्तीच्या कार्यशाळेत मूर्तिकारांची लगबग सुरु झाली आहे. माघ महिन्यातील गणेशजयंती म्हणजेच गणेशजन्म सोहळा गणपती मंदिरमध्ये संपन्न होत असताना मूर्तिपुजनाच्या निमित्ताने गणेशभक्त एक दिवसाचा गणेशोत्सव साजरा करतात.

शहर आणि ग्रामीण भागातील गणेशभक्तांच्या उत्सवासाठी शंभर मूर्ती तयार करण्याचे उद्दिष्ट मूर्तिकारांनी ठेवले आहे. त्यासाठी तीन-चार मूर्तिकार गेल्या महिन्यापासून मेहनत करून गणेश भक्तांच्या मागणीनुसार विविध आकाराच्या मूर्ती शाडूमातीने बनविल्या आहेत. सध्या या नवीन मूर्तीला रंग देण्याचे काम कार्यशाळेत सुरु असून येत्या काही दिवसात या मूर्तीचे देखणे रूप गणेशभक्तांना पाहावयास मिळणार आहे. या मूर्तींना सजविण्यासाठी मुबलक वेळ मिळाल्याने मूर्तिकारांनी आपले काम लवकर उरकण्यासाठी चंग बांधला आहे. या उत्सवातील मूर्तींची मागणी कमी असली तरी त्यानंतर पुढील भाद्रपद महिन्याच्या गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती बनविण्याची सुरुवात अशा मोठ्या कारखान्यातून केली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -