घरताज्या घडामोडीमेट्रोच्या रूपाने आमचं दुसरं स्वप्न पूर्ण होतंय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मेट्रोच्या रूपाने आमचं दुसरं स्वप्न पूर्ण होतंय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं आहे. आता मेट्रोचा हा सोहळा आपण करतो आहोत. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबई जोडलं गेलं. मेट्रोच्या रूपाने आमचं दुसरं स्वप्न पूर्ण झालं आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं आहे. आता मेट्रोचा हा सोहळा आपण करतो आहोत. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबई जोडलं गेलं. मेट्रोच्या रूपाने आमचं दुसरं स्वप्न पूर्ण झालं आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. (Our second dream is coming true in the form of Metro Says Chief Minister Eknath Shinde)

“मुंबईत विविध उपक्रमांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आहेत. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मेट्रोचे भूमिपूजन केलं होतं आणि आज तेच या प्रकल्पाचं लोकार्पण करत आहेत ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. काही लोकांची अपेक्षा होती की हे कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नये पण तसं झालं नाही आज जे घडतं आहे ते आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा होती. महाराष्ट्राची आणि मुंबईची अपेक्षा होती”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

“आमचं सरकार हे प्रगती करतं आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसारच काम करतो आहोत. विविध प्रकारचे विकासाला चालना देणारे निर्णय आम्ही घेतले. शेतकऱ्यांना मदत केली, गोरगरिबांना मदत केली, पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

“विविध निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्या पोटात मळमळ होते आहे, छातीत धडधड होते आहे. सहा महिन्यात या सरकारने एवढं केलं तर पुढच्या दोन वर्षात काय करतील? या अस्वस्थेतूनच ही टीका होते आहे”, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – काही लोकांच्या बेईमानीमुळे अडीच वर्षे डबल इंजिनच्या सरकारला ब्रेक लागला; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -