घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन, शेवटची 'ती' इच्छा कुटुंबीय करणार...

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन, शेवटची ‘ती’ इच्छा कुटुंबीय करणार पूर्ण

Subscribe

चंद्रपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार न करता त्यांचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात यावे, अशी त्यांनी मृत्यूपूर्वी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार, त्यांचा त्यांचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले,1 मुलगी असा परिवार आहे.

मोरेश्वर टेमुर्डे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व होतं. वरोरा- भद्रावती विधानसभेत त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले. तसंच, ते शरद पवारांचेही निकटवर्तीय मानले जातात. वरोरा तालुक्यात पक्षाला बळकटी आणण्यासाठी टेमुर्डे यांचा मोलाचा वाटा आहे. तसंच, त्यांनी पक्षाचे संघटन विस्तारण्यासही मदत केली. १९९१ ते १९९५ आणि १९९५ ते २००० या काळात ते वरोरा क्षेत्राचे आमदार होते. तर, १९९१ ते १९९५ सालात त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्षपदही भुषवले.

- Advertisement -


सविस्तर वृत्त लवकरच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -