घरदेश-विदेशUPSCची वयोमर्यादा २७ वर्षे होणार??

UPSCची वयोमर्यादा २७ वर्षे होणार??

Subscribe

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची वयोमर्यादा ३२ वरून २७ करावी अशी शिफारस केंद्राकडे नीती आयोगानं केली आहे. यावेळी परिक्षेत बदल करण्याची आणि अधिकाऱ्यांच्या व्यवस्थेची फेरमांडणी करण्याची गरज यावेळी नीती आयोगानं व्यक्त केली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC!! अधिकारी बनण्याचं स्वप्न उरात घेऊन अनेक जण या स्पर्धेत उतरतात. बऱ्याच वेळेला वयाचं देखील भान राहत नाही, अशा रितीनं झोकून या परिक्षेची तयारी केली जाते. पण, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची वयोमर्यादा ३२ वरून २७ करावी अशी शिफारस केंद्राकडे नीती आयोगानं केली आहे. यावेळी परिक्षेत बदल करण्याची आणि अधिकाऱ्यांच्या व्यवस्थेची फेरमांडणी करण्याची गरज यावेळी नीती आयोगानं व्यक्त केली आहे. नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती,प्रशिक्षण आणि निवड परिक्षेत काही बदल करण्याची गरज नीती आयोगानं व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांची नियुक्ती ही त्यांच्या वयानुसार करावी असं नीती आयोगाचं मत आहे. २०२० नंतर देशात ६५ टक्के जनतेचं वय हे ३५ वर्षापेक्षा देखील कमी असेल. सध्या UPSCसाठी वयोमर्याादा ३२ वर्षं आहे. त्यामुळे वयोमर्यादा आणि जागा कमी कराव्यात असं नीती आयोगानं म्हटलं आहे. तसेच, विविध विभागांमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती लॅटरल एन्ट्री स्कीममधून करण्यात यावी अशी शिफारस देखील नीती आयोगानं केली आहे. यानुसार परिक्षेमध्ये काही बदल करण्याची शिफारस देखील नीती आयोगानं व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -