घरमहाराष्ट्रनवनीत राणांच्या अडचणीत वाढ; वडील फरार घोषित, मालमत्ताही करणार जप्त

नवनीत राणांच्या अडचणीत वाढ; वडील फरार घोषित, मालमत्ताही करणार जप्त

Subscribe

मुंबई – खासदार नवनीत राणा यांना शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दणका दिला आहे. खोटे प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी नवनीत राणा यांचे वडिल हरभजन सिंह यांना कोर्टाने फरार घोषित केले आहे. तसंच, एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. तो मतदारसंघ अनूसुचित जातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित होता. खोटे प्रमाणपत्र दाखवून नवनीत राणा यांनी येथून निवडणूक लढवली असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यांनी दाखवलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखल्यामध्ये फेरफार असल्याचे आढळून आले. वरून नवनीत राणा आणि त्यांचे वडिल हरभजन सिंह, राम सिंह कुंडलेस यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे शिवडी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरोधात महिन्याभरात दोनवेळा वॉरंट बजावले होते. याप्रकरणी राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत याप्रकरणातून दोषमुक्त करण्याची विनंती करणारी याचिका केली होती. या याचिका मुंबई सत्र न्यायालायने फेटाळून लावली.

- Advertisement -

दरम्यान, शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने खासदार नवनीत राणांना दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात आणि मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली प्रकरणे दोन्ही वेगळी असल्याचं निरिक्षण शिवडी कोर्टाने नोंदवले आहे. तसंच, महिन्याभरात कोर्टापुढे हजर न राहिल्यास प्रॉपर्टी जप्त होण्याची शक्यता आहे. याप्रकरणातील पुढील सुनावणी १६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

नेमका आरोप काय?
जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांच्यावर करण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

- Advertisement -

जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती
खासदार नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी रद्द केले होते. याशिवाय राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे . उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका 2017 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्ज देताना दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीसंदर्भांत दिलेले प्रमाणपत्र हे बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -