घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'माहया नील ले न्याय देजो' अशी आर्त साद घालत, २८वर्षीय विवाहितेची आत्महत्या;...

‘माहया नील ले न्याय देजो’ अशी आर्त साद घालत, २८वर्षीय विवाहितेची आत्महत्या; काय आहे कारण/

Subscribe

नाशिक : पंचवटी परिसरातील चिंतामण नगर भागात राहणाऱ्या २८ वर्षीय विवाहितेने विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. विष प्राशन केल्यानंतर तिने आपल्या आईला शेवटचा फोन करत माहया नील ले न्याय देजो’ अर्थात माझ्या नीलला न्याय मिळवून दे अशी आर्त हाक घातली. मृत महिलेच्या सासरच्या मंडळीसोबत त्यांच्या परंपरागत संपत्ती वरून वाद होता. हिस्सा न देण्यासाठी सासरच्याकडून तिचा छळ करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव मधील शनिपेठ परिसरात राहणाऱ्या कोमल सुरेश देवरे या तरुणीचा २०१६ साली नाशिक येथील मेनरोड परिसरातील अभिजीत राजेंद्र बेलगावकर याच्यासोबत विवाह झाला होता. बेलगावकर कुटुंबीय मेन रोड परिसरात एकत्र राहत होते. या ठिकाणी पावसाळ्यात घर गळत असल्याने सर्व कुटुंबीय हिरावाडी येथे राहावयास गेले. या दोघांच्या संसारात आणखी एका पाहुण्यांचे आगमन झाले. कुटुंबीय एकत्र राहत असल्याने कोमल आणि तिची जाऊ मीनाक्षी यांच्यात सातत्यने वाद होत असल्याने दोघे वेगवेगळ्या ठिकाणी रहावयास गेले. या ठिकाणी नव्या संसाराला सुरवात करताना कोमलने स्वतःचे ब्युटीपार्लर सुरू करून सर्व संसारोपयोगी साहित्य देखील खरेदी केले. काही दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर मेनरोड येथील जुने घर दरुस्त झाले असल्याचा फोन जाऊबाई मिनाक्षी हीने सांगितले. कोमलने देखील पती अभिजीत यांना आपण तिकडे राहायला जाऊ असे सांगितले असता, मला तिकडे राहायचं नाही, मला ते घर पण नको असे बोलून विषय संपवावा असे सांगितले. मात्र कोमलने स्वतः जाऊन सासूकडे याबाबत विनंती केली असता सासूने नकार दिला. सासूने नकार दिला असता जुन्या संपत्तीमध्ये मुलगा निलराज याचे देखील नाव घावे असे कोमल सासूला बोलली असता त्यांच्यात जोरदार वाद झाले.

- Advertisement -

यानंतर, कोमलला सासरच्या मंडळीं कडून त्रास देण्यास सुरवात झाली. तर पती अभिजीतने देखील तू प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत असशील तर तुला घटस्फोट देऊन माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल अशी धमकी दिली. तसेच कोमलच्या चारित्र्यावर संशय घेत तिला त्रास देणे सुरू केले. घडत असलेला सर्व प्रकार कोमलने आई मंगलाबाई व भाऊ कमलेश देवरे याला कळविले होte. दरम्यान २७ जानेवारी रोजी रात्री उशिरा एका अनोळखी क्रमांकावरून कोमलच्या आईला फोन आला. ‘आई आई माझ्या निलला न्याय दे जो’ असे बोलून फोन कट झाला. कोमलची आई व वडिलांनी रेल्वेने रात्री नाशिक गाठले असता ९ वाजता डॉक्टरांनी तिने विषप्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -