घरक्राइमअल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन आरोपींची निर्दोष सुटका

अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन आरोपींची निर्दोष सुटका

Subscribe

राज सिंहने १६ नोव्होंबर २०१६ रोजी पीडितेवर बलात्कार केला. तेव्हा ती तिच्या मैत्रिणीच्या घरी होती. घरात कोणी नसल्याची संधी साधत राजने पीडितेवर बलात्कार केला. त्यावेळी त्याने अश्लील चित्रिकरण केले. याबाबत कोणाला सांगू नकोस असेही राजने पीडितेला धमकावले होते. त्यानंतर अश्लील चित्रिकरणाच्या आधारावर राजने पीडितेवर अत्याचार केला, असा आरोप होता.

मुंबईः अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपातून तीन आरोपींची विशेष न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली आहे. सचिन बनसोडे. सुभाष बनसोडे आणि राज सिंह अशी या तीन आरोपींची नावे आहेत.

यातील राज सिंहने १६ नोव्होंबर २०१६ रोजी पीडितेवर बलात्कार केला. तेव्हा ती तिच्या मैत्रिणीच्या घरी होती. घरात कोणी नसल्याची संधी साधत राजने पीडितेवर बलात्कार केला. त्यावेळी त्याने अश्लील चित्रिकरण केले. याबाबत कोणाला सांगू नकोस, असेही राजने पीडितेला धमकावले होते. त्यानंतर अश्लील चित्रिकरणाच्या आधारावर राजने पीडितेवर पुन्हा एकदा अत्याचार केला, असा आरोप होता.

- Advertisement -

त्यानंतर २८ ऑक्टोबर २०१७ रोजी राजने तिला बोलावले. त्यावेळी धमकावून पीडितेवर राजसह सुभाष बनसोडे, सचिन बोनसाेडे व अन्य दोघांनी बलात्कार केला. याची पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यावेळी पीडिता अल्पवयीन होती. अतिप्रसंगामुळे ती गरोदर राहिली. नंतर तिचा गर्भपात झाला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्याविरोधात बलात्काराचे आरोप आरोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपींविरोधात आरोप निश्चिती झाली. त्यांनी आरोप फेटाळल्याने विशेष न्यायालयात याचा खटला चालला. आरोपी सुभाष बनसोडेच्यावतीने adv प्रकाश साळशिंगीकर यांनी युक्तीवाद केला.

मुळात पीडितेवर बलात्कार झाला असल्याचा आरोप आहे. मात्र घटना घडली तेव्हा तिच्या शरीरावर जखमा होत्या असा वैद्यकीय अहवाल नाही. पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केला असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. अन्य दोन दोघांना यात आरोपी करण्यात आलेले नाही. तसेच तीनच आरोपींचे रक्ताचे नमून घेण्यात आले. नमूना चाचणी अहवालातून या तीन आरोपींनी बलात्कार केल्याचे सिद्ध होत नाही. पीडिता अल्पवयीन होती याचाही पुरावा सादर झालेला नाही. त्यामुळे या तीनही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात यावी, अशी मागणी adv प्रकाश साळशिंगीकर यांनी न्यायालयात केली. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने तीनही आरोपींची निर्दोष सुटका केली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -