घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपाचशेच्या ऐवजी २०रुपयांच्या नोटा; जनता बँकेच्या सीईओ आणि कॅशियरने हडपले 'इतके' लाख

पाचशेच्या ऐवजी २०रुपयांच्या नोटा; जनता बँकेच्या सीईओ आणि कॅशियरने हडपले ‘इतके’ लाख

Subscribe

नाशिक : मालेगाव शहरातील जनता को ऑपरेटीव्ह बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी व रोखपालाने संगनमताने २८ लाख ८० हजाराचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, बँकेच्या स्ट्राँग रुममधील गोदरेज कंपनीच्या लोखंडी सेफमधील पाचशे रुपयांच्या नोटांच्या जागी २० रुपयांच्या नोटांचे बंडल ठेवून कॅश बुकमध्ये नमूद केल्याचे समोर आले आहे. दोघांना जनता बँक मुस्लीम बहुल पुर्व भागातील अ वर्ग दर्जाची अग्रणी बँक आहे. या बँकेतच गैरव्यवहार झाल्याने खातेदारांमध्ये चिंते वातावारण निर्माण झाले आहे.

बँकेच्या मुख्य कार्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी अन्सारी इम्तियाज अहमद अहमदउल्ला (वय ६२) व रोखपाल जावेद अहमद सिद्दीक अहमद (वय ३१) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. इस्लामपुरा वॉर्ड औद्योगिक सहकारी संस्थेच्या आवारात जनता को ऑपरेटीव्ह बँकेचे मुख्य कार्यालय आहे. बँकेच्या मालेगाव शहरात पाच शाखा आहेत. बँकेच्या मुख्य कार्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी अन्सारी इम्तियाज अहमद अहमदउल्ला व रोखपाल जावेद अहमद सिद्दीक अहमद यांनी संगनमत करुन २८ लाख ८० हजाराची रक्कम हडप केली.

- Advertisement -

याबाबत शंका आल्याने तक्रार व चौकशी करण्यात आली. बँकेच्या स्ट्राँग रुममधील गोदरेज कंपनीच्या लोखंडी सेफमधील रोख रक्कम रिझर्व बँकेचे निरीक्षक अधिकारी चिरंजीव पल्लव यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली असता ५०० रुपयाच्या नोटांचे बंडलच्या तळाशी पाठीमागील बाजूस पाचशे रुपयांच्या नोटांच्या जागी २० रुपयांच्या नोटांचे बंडल ठेवून कॅश बुकमध्ये नमूद करण्यात आले. प्रत्यक्षात एकूण शिल्लक रक्कमेपैकी २८ लाख ८० हजर रुपये कमी मिळून आले. यानंतर दोघांनी संगनमताने गैरव्यवहार व विश्वासघात केल्याचे आढळून आले. शाखा व्यवस्थापक जुनैद अहेमद इकबाल अहमद यांच्या तक्रारीवरुन संशयित दोघांविरुध्द मालेगाव शहर पोलीस ठाण्यात अपहार व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -