घरमहाराष्ट्रकसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची शिष्टाई, सर्वपक्षीय नेत्यांशी संपर्क

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची शिष्टाई, सर्वपक्षीय नेत्यांशी संपर्क

Subscribe

मुंबई : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन भाजपाने केले असले तरी, या दोन्ही जागा लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी घेतला असल्याचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना फोन केला आहे.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार अनुक्रमे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. त्यामुळे या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 7 फेब्रुवारी असून 10 फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा हवाला देत या दोन्ही पोटनिवडणूत बिनविरोध करण्याचे आवाहन भाजपाने केले आहे.

- Advertisement -

पण महाविकास आघाडीने नांदेड आणि पंढरपूर या पोटनिवडणुकीची आठवण करून देत, कसबापेठ व चिंचवड पोटनिवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. नांदेड आणि पंढरपूर या दोन्ही ठिकाणी मृत आमदारांच्या घरातील नातेवाईक उभे होते तरी, तिथे निवडणुका झाल्या. अंधेरी पोटनिवडणूक ही अपवाद होती, असा युक्तिवाद महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याकरिता महाविकास आघाडीला पत्र लिहिले आहे. जो उमदेपणा भाजपाने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात, अशी इच्छा राज ठाकरे यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील, मुंबईतील पोटनिवडणुकीत भाजपने आणि आम्हीही उमेदवार मागे घेतला होता. त्यामुळे कसबा पेठ आणि चिंचवड येथे इतर पक्षांनी उमेदवार न देता ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन यापूर्वीच केले आहे. याबाबत त्यांनी काल, शनिवारी पुन्हा एकदा शिष्टाई करण्याचे प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी कॅांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची केली मागणी त्यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -