घरमहाराष्ट्रपुणेएक-दीड वर्षासाठी निवडणूक का? मनसेकडून शरद पवारांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

एक-दीड वर्षासाठी निवडणूक का? मनसेकडून शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Subscribe

Sharad Pawar's Viral Video | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल केला आहे. शरद पवारांच्या या व्हिडीओवरूनच मनसेने महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत.

Sharad Pawar’s Viral Video | मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहित कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाने जसा उमदेपणा दाखवला तसाच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही दाखवावा असं राज ठाकरे म्हणाले आहेत. तसंच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल केला आहे. शरद पवारांच्या या व्हिडीओवरूनच मनसेने महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. (MNS Shared Sharad Pawar’s old Video on tweeter)

हेही वाचा – कसबा-चिंचवडच्या पोटनिवडणुका बिनविरोध करा, राज ठाकरेंचे मविआला पत्र

- Advertisement -

आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीकरता त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा दाखला देत येत्या एक-दीड वर्षांतच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे एक दीड वर्षासाठी निवडणूक घेण्यापेक्षा या जागेवर बिनविरोध उमेदवार निवडून यावा, अशी मागणी शरद पवारांनी केली होती. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा मांडला होता. याच पत्रकार परिषदेतील शरद पवारांचा बिनविरोधाचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अधोरेखित केला आहे. मनसेच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून हा व्हीडिओ प्रदर्शित करून शरद पवारांची ही भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यानांच मान्य नाही का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकांसाठी मनसे इच्छूक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, या जागांवर बिनविरोध निवडणूक होण्यासाठी राज ठाकरेंनी लेटर बॉम्ब फोडून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे राज ठाकरेंची ही विनंती महाविकास आघाडीचे नेते मान्य करून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जोपासतात की भाजपाला धोबीपछाड देतात हे पाहावं लागेल.

हेही वाचा – बिनविरोध निवडणुकीचं आवाहन तर केलं, पण राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा नक्की अर्थ काय?

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -