घरठाणेडॉ. आव्हाडांविरोधात चिथावणी देणा-यावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा

डॉ. आव्हाडांविरोधात चिथावणी देणा-यावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा

Subscribe

राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणार्‍यास 10 लाखांचे इनाम जाहीर करणारा भाजपचा जालना युवामोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल देहेरकर याच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुजाता घाग यांनी या संदर्भात लेखी तक्रार दिली. यावेळी, “आगामी २४ तासात गुन्हा दाखल करून देहेरकरला अटक केली नाही तर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करू,” असा इशारा सुजाताताई घाग यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा गैरअर्थ लावून त्यांच्या विरोधात कपिल देहेरकर याने चिथावणी देणारे विधान केले आहे. डॉ. आव्हाड यांच्यावर हल्ला करण्यासाठी जमावाला चिथावणी देण्याचे काम देहेरकर याने केले आहे. देहेरकर याने जालना येथे आंदोलन करुन डॉ. आव्हाड यांचे छायाचित्रही जाळले होते. त्याने केलेले कृत्य हे समाजविघातक असल्याचा आरोप करीत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार सुजाता घाग यांनी दिली होती. या फिर्यादीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असे लेखी तक्रारीत म्हटले आहे. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले .

- Advertisement -

दरम्यान, डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सन्मा परिषदेमध्ये जे विधान केले आहे. ते अर्धवट दाखवून लोकांना चिथावणी देण्याचे काम सध्या काही समाजकंटकांकडून केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. आव्हाड हे खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. महापुरुषांचा कलंकित इतिहास बदलण्यासाठी डॉ. आव्हाड हे आग्रही आहेत. खरा इतिहास बाहेर आला तर अनेकांना पळता भुई थोडी होईल, याची जाणीव असल्यामुळेच डॉ. आव्हाड यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणे योग्य आहे. पण, त्यांना ठार मारण्याची सुपारी देण्यापर्यंत या समाजकंटकांची मजल गेली आहे. त्यामुळे या समाजकंटकावर आगामी २४ तासात गुन्हा दाखल करून अटक करावी; अन्यथा, आम्ही पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा यावेळी सुजाता घाग यांनी दिला.

यावेळी सुजाता घाग यांच्या समवेत मेहरबानू पटेल, माधुरी सोनार, ज्योती निम्बर्गी, स्मिता पारकर, वंदना लांडगे, शुभांगी कोळपकर, अनिता मोटे , संगीता शेळके, पुनम वालिया, हाजी बेगम, स्नेहल चव्हाण, ज्योती चव्हाण, सुवर्णा खिल्लारे, शुभांगी खेडेकर, लता सूर्यवंशी,वंदना भाईगडे, जया सुर्वे, पौर्णिमा अहिरे, सुनिता खरात आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -