घरमनोरंजन"त्यांना एकत्र पाहणं परिकथेसारखं"; करण जौहरची कियारा-सिद्धार्थसाठी खास पोस्ट

“त्यांना एकत्र पाहणं परिकथेसारखं”; करण जौहरची कियारा-सिद्धार्थसाठी खास पोस्ट

Subscribe

आलिया भट्ट, विक्की कौशल, कतरिना कैफ, रश्मिका मंदाना, श्रद्धा कपूर यांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच करण जौहरने कियारा-सिद्धार्थसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड मधील सर्वात क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा काल (7 फेब्रुवारी) अखेर विवाहबंधनात अडकले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि कियाराचा मेहंदी समारंभ 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पार पडला होता. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांचा हळदी समारंभ पार पडला. तसेच परवा संध्याकाळी त्यांचे संगीत देखील झाले. काल (7 फेब्रुवारी) रोजी यांचा विवाह सोहळा पार पडला.

- Advertisement -

वर-वधूने पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

- Advertisement -

काल रात्री उशीरा कियारा-सिद्धार्थने आपल्या लग्नाचे काही फोटो शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी सांगितली. या शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत होते.कियाराने हलक्या गुलाबी रंगाची डिझायनर घागरा परिधान केला होता. सोबतच हिरव्या रंगाचा डायमन्ड हार घातला होता. तर सिद्धार्थने गोल्डन रंगाची एबरॉटी शेरवानी परिधान केली होती. यावेळी फोटोंसोबत खाली कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, “अब हमारी परमनंट बुकिंग हो गई, आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे.” असं कियारा-सिद्धार्थने लिहिलंय. त्यांच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आलिया भट्ट, विक्की कौशल, कतरिना कैफ, रश्मिका मंदाना, श्रद्धा कपूर यांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच करण जौहरने कियारा-सिद्धार्थसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्याने लिहिलंय की, “मी त्याला दीड दशकांपूर्वी भेटलो होतो…तो शांत, कणखर आणि संवेदनशील… मग मी तिला खूप वर्षांनी भेटलो… ती शांत, कणखर आणि तितकीच संवेदनशील… त्यानंतर ते एकमेकांना भेटले आणि मला त्या क्षणी कळले की हे दोघं एक चांगला बाँड निर्माण करू शकतात आणि एकत्र येऊन एक जादुई प्रेम कथा तयार करू शकतात…त्यांना एकत्र पाहणं हे परीकथेसारखं आणि कुटुंबात रुजलेल्या एका परंपरेसारखे आहे. आज प्रेमाच्या मंडपात त्यांनी शपथ घेतली, तेव्हा प्रत्येकाला एक वेगळीच उर्जा जाणवली. मी अभिमानाने, आनंदाने, त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करत बसलो. सिड-कियारा मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो, तुमचं संपूर्ण आयुष्य आजच्याच दिवसासारखं असो,” अशी पोस्ट करण जौहरने लिहिली आहे.

 


हेही वाचा :

हमारी परमनंट बुकिंग हो गई… लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराचं ट्विट चर्चेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -