घरभक्तीआज आहे द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या पौराणिक कथा आणि महत्त्व

आज आहे द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या पौराणिक कथा आणि महत्त्व

Subscribe

या महिन्यात 9 फेब्रुवारी म्हणजेच आज द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी केलेली पूजा-आराधना उत्तम मानली जाते. द्विजप्रिया संकष्टीला श्री गणेशांच्या 32 रुपातील 6 व्या रुपाची पूजा केली जाते.

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. हिंदू मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने गणपती बाप्पा सर्व मनोकामना पूर्ण करतात.माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या महिन्यात 9 फेब्रुवारी म्हणजेच आज द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी केलेली पूजा-आराधना उत्तम मानली जाते. द्विजप्रिया संकष्टीला श्री गणेशांच्या 32 रुपातील 6 व्या रुपाची पूजा केली जाते.

द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी मुहूर्त 

चतुर्थी प्रारंभ – 09 फेब्रुवारी 2023 सकाळी 06:23 वाजता
चतुर्थी समाप्ती – 10 फेब्रुवारी 2023 सकाळी 07:58 वाजता

- Advertisement -

द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी द्विजप्रिया संकष्टी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात.

द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी व्रत कथा

High-definition wallpapers of Lord Ganesha for your PC

- Advertisement -

 

पौराणिक कथेनुसार, एक सावकार आपल्या पत्नीसोबत एका शहरात राहत होता. दोघांनाही मूलबाळ नव्हते. एके दिवशी सावकाराची पत्नी शेजाऱ्यांच्या घरी गेली, त्या घरात संकष्टी चतुर्थीची पूजा आणि कथा वाचन सुरु होते. सावकाराची बायको ते ऐकून घरी आली तिने देखील संकष्टीचे व्रत केले. त्यानंतर काही दिवसांनी श्री गणेश तिच्यावर प्रसन्न पुत्रप्राप्तीचा आशिर्वाद दिला. त्यांना एक मुलगा झाला तो मुलगा मोठा झाल्यावर सावकराने श्रीगणेशाची प्रार्थना केली की जर आपल्या मुलाचे लग्न ठरले तर आपण उपवास करून प्रसाद देऊ, पण मुलाचे लग्न ठरल्यानंतर सावकार प्रसाद व उपवास करण्यास विसरला. त्यामुळे श्रीगणेश त्याच्यावर नाराज झाले आणि त्यांनी सावकाराच्या मुलाला लग्नाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला बांधून ठेवले.

काही वेळाने एक अविवाहित मुलगी पिंपळाच्या झाडाजवळून जात असताना सावकाराच्या मुलाचा आवाज ऐकून तिने आईला सांगितले. हे सर्व समजल्यानंतर सावकाराच्या पत्नीने श्रीगणेशांची क्षमा मागितली, प्रसाद दिला आणि उपवास केला आणि आपल्या मुलाला परत पाहण्याची इच्छा करू लागली. भगवान गणेशाने सावकाराच्या मुलाला परत केले आणि सावकाराने आपल्या मुलाचे लग्न केले. तेव्हापासून संपूर्ण शहरातील सर्व लोक चतुर्थीचा उपवास करून गणेशाची पूजा करू लागले.


हेही वाचा :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -