घरमहाराष्ट्रविरोधी पक्षाविरोधात षडयंत्र रचलं जातंय का? संजय राऊतांचा सवाल

विरोधी पक्षाविरोधात षडयंत्र रचलं जातंय का? संजय राऊतांचा सवाल

Subscribe

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे फडणवीस सरकारला सवाल केलाय.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे फडणवीस सरकारला सवाल केलाय. आदित्य ठाकरे यांच्यावरील दगडफेक प्रकरणात पोलीस सारवासारव करत असल्याचा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला. आदित्य ठाकरे प्रमुख नेते आहेत, त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. अचानक सुरक्षा काढून घेण्यात आली, तसंच मराठवाड्यातील आमदार प्रज्ञाताई सातव यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. हे सगळं पाहता राज्यात कायदा सुव्यवस्थेबाबत अराजक आणि अनागोंदी सुरू असल्याचं यावेळी संजय राऊत म्हणाले.

यापुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यात आमदार किंवा लोकप्रतिनिधी सोडाच पण सामान्य जनता, महिला आणि व्यापारी सुद्धा भीतीच्या सावटाखाली आहे. विरोधी पक्ष सुद्धा दहशतीखाली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात कटकारस्थान रचण्याचा हा डाव आहे का ? असा सवाल संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केलाय. सत्ताधारी पक्ष विरोधकांवर हल्ले आणि रक्तपात करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केलाय.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावरील दगडफेक प्रकरण आणि त्यानंतर आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न यावरून संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशाराच दिलाय. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जीवघेणे हल्ले व्हावेत आणि त्यातून दहशत निर्माण व्हावी असा काही कटकारस्थान आहे का? त्यांच्या पक्षात जाणारे काही लोक, त्यांच्या मागेपुढे पोलीस, सुरक्षारक्षकांचा लवाजमा आहे. त्यांना गरज नाही. पण ज्यांना खरंच सुरक्षेची गरज आहे, त्यांच्याविषयी ढिलाईनं काम केलं जातंय. गृहमंत्र्यांनी वेळीच पावलं उचलली नाहीत, तर त्याचा सगळ्यात मोठा फटका त्यांना बसू शकतो” असं म्हणत संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलंय.

शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी तब्बल ३९ आमदार सोबत घेऊन बंड पुकारणारे एकनाथ शिंदेनी राज्यातील राजकीय समीकरणंच बलदून टाकली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस असून ठाकरे गटाचे संजय राऊत हे मात्र एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्य़ासाठी विसरले नाहीत. ‘माझे सहकारी म्हणून एक व्यक्ती म्हणून वाढदिवसाला त्यांना आम्ही शुभेच्छा देतच असतोच आम्ही राजकीय शत्रू आहोत आणि शत्रू कायम राहणार. पण एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस आहे तर त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -